होशियारपूर (पंजाब): भारत जोडो यात्रेदरम्यान पंजाबमधील होशियारपूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वरुण गांधींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. यासोबतच त्यांनी आरएसएसवरही निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, देशातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढती दरी सातत्याने वाढत आहे. देशातील 1 टक्के लोकांकडे देशातील 40 टक्के संपत्ती असल्याचे राहुल म्हणाले. ते म्हणाले की, देशातील 21 लोकांकडे 70 कोटी लोकांइतका पैसा आहे. भारत जोडो यात्रेअंतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाबमधील होशियारपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली.
वरुण गांधींवर पहिल्यांदाच वक्तव्य : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पहिल्यांदाच वरुण गांधींवर वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, 'मी भाजपमध्ये आहे, माझी विचारधारा त्यांच्याशी जुळत नाही. माझा गळा कापला तरच मी संघाच्या कार्यालयात जाऊ शकतो. वरुणने ती विचारधारा स्वीकारली. मी त्याला भेटू शकतो, मिठी मारू शकतो पण त्याची विचारधारा अंगीकारू शकत नाही.' एकीकडे वरुण गांधी भाजपात असूनही सरकारला खडेबोल सुनावत असताना दुसरीकडे राहुल गांधी यांची ही प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.
हा प्रकार म्हणजे सुरक्षेतील त्रुटी नाही: पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनीही सुरक्षेतील त्रुटींबाबत वक्तव्य केले. सुरक्षेमध्ये कोणती त्रुटी नाही असे त्यांनी सांगितले. 'तो मला मिठी मारायला आला आणि खूप आनंद झाला. याला सुरक्षेतील त्रुटी म्हणता येणार नाही. प्रवासात हे होतच राहते', असे राहुल म्हणाले. 'आरएसएस आणि भाजप भारतातील सर्व संस्थांवर नियंत्रण ठेवत आहेत. सर्व संस्थांवर त्यांचा दबाव आहे. त्यांनी निवडणूक आयोग, नोकरशाही, न्यायव्यवस्था काबीज केली आहे. पूर्वी जी राजकीय लढाई व्हायची ती ही नाही. आता लढा भारताच्या संस्था आणि विरोधक यांच्यात आहे', असेही त्यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण व्यवस्थाच काबीज केली:आरएसएस आणि भाजप भारतातील सर्व संस्थांवर नियंत्रण ठेवत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. सर्व संस्थांवर त्यांचा दबाव आहे. त्यांनी निवडणूक आयोग, नोकरशाही, न्यायव्यवस्था काबीज केली आहे. पूर्वी जी राजकीय लढाई व्हायची तीच नाही. आता लढा भारतातील संस्था आणि विरोधक यांच्यात आहे. माध्यमांची गुलामगिरी करण्याची ताकद आमच्यात नाही. द्वेष पसरवणारी माध्यमे आज लक्ष दुसरीकडे वळवत आहेत. तुम्ही लोक हिंदू मुस्लिम म्हणता, ऐश्वर्या राय, शाहरुख खान, बॉलीवूड, तेंडुलकर याकडे बघा. आणि दुसरीकडे इथे शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.
हेही वाचा: पंजाब सरकारने दिल्लीचे रिमोट कंट्रोल होऊ नये राहुल गांधींचा घणाघात