नवी दिल्ली - सोनिया गांधी यांच्या आईचे नाव पाऊलो मायनो असे होते. त्यांचे निधन झाल्यानंतर गांधी परिवाराकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, जयराम रमेश यांनी ट्विटकरून आज ही माहिती दिली. इटलीमध्ये सोनिया गांधी यांचे कुटुंब राहते. जयराम रमेश आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की ''श्रीमती सोनिया गांधी यांच्या आई श्रीमती पाऊलो मायनो यांचे शनिवारी 27 ऑगस्ट 2022 रोजी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले. मंगळवारी दफनविधी करण्यात आले. सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय तपासणासीठी राहुल गांधी, प्रियांका गांधी हे देखील ब्रिटनला गेले होते.
वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात - 24 ऑगस्ट रोजी काँग्रेसने एक निवेदन जारी केले होते की, सोनिया गांधी या राहुल गांधी आणि मुलगी प्रियांका गांधी यांच्यासोबत परदेशात जाणार आहेत. नवी दिल्लीत परतण्यापूर्वी सोनिया आपल्या आजारी आईचीही भेट घेणार असल्याचे निवेदनात म्हटले होते. गेल्या आठवड्यात सोनिया गांधी आपल्या आईला भेटायला गेल्या होत्या. हा दौरा वैद्यकीय तपासणीसाठी त्यांच्या परदेश दौऱ्याचा एक भाग होता, जिथे त्यांचा मुलगा राहुल गांधी आणि मुलगी प्रियांका गांधी वड्रा त्यांच्यासोबत होते. सोनिया गांधी अजूनही वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा गेल्या काही वर्षांत त्यांच्या आजीला भेटण्यासाठी अनेक वेळा इटलीला जात होते.
30 सप्टेंबरलाच निकाल जाहीर होऊ शकतो - 2020 मध्ये, जेव्हा राहुल गांधींना त्यांच्या वारंवार परदेश दौऱ्यांवरून काही टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यावर पक्षाने सांगितले होते की, ते एका आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी वैयक्तिक कारणासाठी इटलीला गेले होते. दरम्यान, काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गदारोळात, काळजीवाहू राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जागी नवीन पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. मात्र, अध्यक्षपदासाठी एकच उमेदवार असेल तर, अशा स्थितीत 30 सप्टेंबरलाच निकाल जाहीर होऊ शकतो.
कसा आहे सोनिया गांधी यांचा परिवार -सोनिया गांधी यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 रोजी लुसियाना, व्हेनेटो सिटी, इटली येथे झाला. वडील स्टेफानो माइनो आणि आई पाओला. ज्या शहरात मिनो कुटुंब राहत होते, तेथील 95 टक्के लोकसंख्या रोमन कॅथोलिक ख्रिश्चन कुटुंबांमधून आली होती. सोनिया आणि तिचे कुटुंब नंतर ओर्बासनो, ट्यूरिन येथे स्थायिक झाले. इथेच त्यांनी शिक्षण घेतले.