महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sonia Gandhi Corona Positive: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण - Sonia Gandhi infected corona

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. काल (बुधवार) संध्याकाळी सोनिया गांधी यांना हलका ताप आला होता. ( Sonia Gandhi corona Positive ) त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी

By

Published : Jun 2, 2022, 1:03 PM IST

नवी दिल्ली -कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. ( Sonia Gandhi Corona Positive ) सुरजेवाला असेही म्हणाले की, सोनिया गांधी ज्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटल्या होत्या, त्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. सोनिया गांधी यांना काल (बुधवारी) संध्याकाळी थोडा ताप आला होता, त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ज्यामध्ये त्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

सोनिया गांधी 75 वर्षांच्या आहेत. गेल्या 10 वर्षांपासून त्या विविध आजारांशी झुंज देत आहेत. सोनिया गांधी यांना बुधवारी संध्याकाळी सौम्य ताप आला होता, त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. ( Sonia Gandhi infected with corona ) कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर सोनिया गांधी यांनी सध्या वेगळ्या राहत आहेत.

सोनीया गांधी यांच्यावर सध्या आवश्यक ते उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांनी प्रकृती ठीक आहे अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली आहे. 8 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्या पार्श्वभूमीवर 8 जूनपूर्वी सोनिया गांधी बऱ्या होतील अशी आशा सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे.

सोनिया गांधीयांची नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात नियमित तपासणी झाली. याशिवाय (2018)साली त्या उपचारासाठी अमेरिकेलाही गेल्या होत्या. वयोमानानुसार सोनिया गांधींना कायम तब्येत अडचणी असतात. या पार्श्वभूमीवर त्या गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळतात. त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्या कारणामुळे त्या गेल्या काही वर्षांपासून रॅली टाळत आहेत.

हेही वाचा -हॉलिवूड स्टार जॉनी डेपने माजी पत्नी अंबर हर्ड विरोधातील मानहानीचा खटला जिंकला

ABOUT THE AUTHOR

...view details