नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज रविवार (दि. 12 जुन)रोजी सकाळी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, त्यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाचीही लागण झालेली आहे. ( Sonia Gandhi Health Deteriorated ) परंतु, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. ( Sonia Gandhi Admitted ) कोणतेही काळजीचे कारण नाही अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. त्याचवेळी, सोनीया यांना काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे असही सुरजेवाला यांनी सांगितले आहे.
सर्व हितचिंतकांचे त्यांच्या काळजी आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. त्याचवेळी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या हायकमांडला चांगले आरोग्य आणि चांगले स्वास्थ्य लाभावे यासाठी प्राथना केली आहे. तसेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सोनिया गांधींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोनीया गांधी यांना लवकरात लवकर बरे लागावे यासाठी आपण प्रार्थना करूया असे बॅनर्जी म्हणाल्या आहेत.