महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Congress President Election: काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार.. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची घोषणा - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

मुख्यमंत्री अशोक गेहलोत Rajasthan CM Ashok Gehlot यांनी मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लवकरच उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा करणार Congress President Nomination row आहे. देशाच्या सध्याच्या परिस्थितीत प्रबळ विरोधी पक्ष असणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

RAJASTHAN CM ASHOK GEHLOT
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

By

Published : Sep 23, 2022, 10:46 AM IST

जयपूर ( राजस्थान ) :मुख्यमंत्री अशोक गेहलोत Rajasthan CM Ashok Gehlot यांनी मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लवकरच उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा करणार Congress President Nomination row आहे. देशाच्या सध्याच्या परिस्थितीत प्रबळ विरोधी पक्ष असणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

30 नामांकनाची अंतिम तारीख: काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहेत. तसेच, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झाली. पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने ही अधिसूचना जारी केली आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार, अधिसूचना जारी झाल्यानंतर आता 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल. अधिसूचना जारी होण्याच्या एक दिवस अगोदर बुधवारी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी 22 वर्षांनंतर देशातील सर्वात जुन्या पक्षाचे अध्यक्षपद निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जाईल, असे स्पष्ट संकेत दिल्यानंतर ही शक्यता बळकट झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details