नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांच्या (CWC) नावांची घोषणा केली. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी या तिघांचाही यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे, खरगे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शथी थरूर यांनाही कार्यकारणीत स्थान दिलंय. मल्लिकार्जुन खरगे यांच्या उमेदवारीला थरूर यांनी आव्हान दिले होते.
सचिन पायलट यांनाही स्थान मिळाले : खरगे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अधीर रंजन चौधरी आणि पी चिदंबरम यांनाही CWC मध्ये स्थान दिलंय. तर राजस्थानमध्ये बंडखोरी करणाऱ्या सचिन पायलट यांचाही या नव्या टीममध्ये समावेश करण्यात आलाय. याशिवाय पवन खेडा, सुप्रिया श्रीनेत, अलका लांबा, यशोमती ठाकूर या प्रमुख चेहऱ्यांनाही CWC मध्ये स्थान मिळालंय.
CWC सदस्य पुढीलप्रमाणे : मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, एके अँटनी, अंबिका सोनी, मीरा कुमार, दिग्विजय सिंह, पी चिदंबरम, तारिक अन्वर, लाल थनहवला, मुकुल वासनिक, आनंद शर्मा, अशोक चव्हाण, अजय माकन, चरणजीत सिंग चन्नी, प्रियांका गांधी वड्रा, कुमारी सेलजा, गायखंगम, एन रघुवीर रेड्डी, शशी थरूर, ताम्रध्वज साहू, अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद, जयराम रमेश, जितेंद्र सिंग, रणदीप सुरजेवाला, सचिन पायलट, दीपक बाबरिया, जगदीश मीर ठाकोर, गुलाम अहमद मीर, अविनाश पांडे, दीपा दासमुन्शी, महेंद्रजित सिंग मालवीय, गौरव गोगोई, सय्यद नासिर हुसेन, कमलेश्वर पटेल आणि केसी वेणुगोपाल.