लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने प्रतिज्ञा यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा 21 सप्टेंबरला संपणार आहे. काँग्रेसची यात्रा एकूण 12,242 किलोमीटरची असणार आहे. यात्रेतील मार्ग आणि नेत्यांची नावे काँग्रेसने निश्चित केली आहे. या यात्रेत काँग्रेस पूर्ण ताकद पणाला लावणार आहे.
काँग्रेसने प्रतिज्ञा यात्रेत सर्व मोठ्या नेत्यांवर जबाबदारी सोपविली आहे. काँग्रेसने पश्चिमी उत्तर प्रदेश, बुंदेलखंड-लखनौ, पूर्वांचल, अवध और पश्चिमी देवीपाटनच्या क्षेत्रानुसार आणि जाती-धर्मानुसार नेत्यांची यात्रेतील मार्गावर नियुक्ती केलेली आहे. ज्या क्षेत्रात ज्या जातीचे वर्चस्व, त्या क्षेत्रात संबंधित नेत्यांवर यात्रेची जबाबदारी सोपविलेली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सर्व प्रभारी यात्रेत समन्वयाकडे लक्ष देणार आहे. ही यात्रा 103 विधानसभा आणि 500 गावांमधून जाणार आहे.
हेही वाचा-SCO SUMMIT व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून पंतप्रधान होणार सहभागी; परराष्ट्रमंत्री थेट परिषदेत राहणार हजर
पश्चिम उत्तर प्रदेशमधील यात्रेची यांच्यावर असणार जबाबदारी
पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस प्रतिज्ञा यात्रेची जबाबदारी राष्ट्रीय सचिव धीरज गुर्जर आणि तौकीर आलम यांच्यावर सोपविणार आहे. ही यात्रा सहारनपूर, शामली, मुजफ्फरनगर, बिजनौर, मेरठ, हापुड, अमरोहा, मुरादाबाद रामपूर आणि बरेलीमार्गे जाणार आहे.