नवी दिल्ली: महागाई, बेरोजगारी, जीएसटी, अग्निपथ योजना आदींविरोधात काँग्रेसने आज देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे (Nationwide Protest of Congress). दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांना पत्र लिहून जंतर-मंतर वगळता संपूर्ण नवी दिल्ली परिसरात १४४ कलम लागू असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची परवानगी देता येणार नाही. कलम 144 चे उल्लंघन केल्यास आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
Congress nationwide protest: काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन, खरगेंनी काळे कपडे घालून केला महागाईचा निषेध - खरगेंनी काळे कपडे घालून केला महागाईचा निषेध
काँग्रेसने आज देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे (Nationwide Protest of Congress). महागाई, बेरोजगारी, जीएसटी, अग्निपथ योजना आदींविरोधात काँग्रेस आंदोलन करत आहे. राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काळा नेहरू आणि काळा फेटा घातला होता. काळे कपडे घालून त्यांनी महागाईचा निषेध केला. दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. जंतरमंतर वगळता संपूर्ण नवी दिल्ली परिसरात कलम १४४ लागू असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
![Congress nationwide protest: काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन, खरगेंनी काळे कपडे घालून केला महागाईचा निषेध काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन, पोलिसांचा इशारा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16019820-thumbnail-3x2-cong.jpg)
नवी दिल्ली क्षेत्राच्या डीसीपीने 2 आणि 4 ऑगस्टला दोनदा काँग्रेस नेत्याला हे पत्र लिहिले आहे. यामध्ये माहितीसह त्याचे इशारेही देण्यात आले आहेत. नवी दिल्ली परिसरातील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांना गुप्तचर विभागाकडून काही सूचनाही मिळाल्या आहेत. त्यामुळे आज सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पंतप्रधानांचे निवासस्थान आणि सर्व व्हीव्हीआयपींच्या घराभोवती विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काळा नेहरू आणि काळा फेटा घातला होता. काळे कपडे घालून त्यांनी महागाईचा निषेध केला. काँग्रेसने महागाई, बेरोजगारी, जीएसटी, अग्निपथ योजनेच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. त्याची सुरुवात राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेने झाली. राष्ट्रपती भवन, पीएम हाऊस आदी मोर्चाला घेराव घालण्यात येणार आहे.