महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 10, 2022, 5:52 PM IST

ETV Bharat / bharat

Shashi Tharoor troll : काँग्रेस खासदार शशी थरूर ट्विटरवर ट्रोल

काँग्रेस खासदार शशी थरूर पुन्हा एकदा ट्विटरवर ( Shashi Tharoor Twitter Troll ) ट्रोल झाले आहेत. या वेळी त्याच्या कॅप्शन आणि जॅकेटमध्ये राष्ट्रध्वज उलटा पिन केल्याबद्दल ( national flag upside down pin ) त्यांच्यावर टीका होत आहे. थरूर सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. याबद्दल  ट्विटरवर थरूर सातत्याने पोस्ट करत आहेत. अनेकदा थरूर त्यांच्या चाहत्यांसोबत, सेलिब्रिटींसोबत सोशल मीडियावर सेल्फी शेअर करीत असतात.

शशी थरूर ट्विटरवर ट्रोल
शशी थरूर ट्विटरवर ट्रोल

Intro:Body:

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रोल झाले आहेत. या वेळी त्याच्या कॅप्शन आणि जॅकेटमध्ये राष्ट्रध्वज उलटा पिन ( national flag upside down pin ) केल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत आहे. 9 जून रोजी थरूर यांनी एक ट्विट केले होते, ज्यामध्ये त्यांनी व्हेनिसमधून एक सेल्फी पोस्ट केली होती. त्यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते की, मी अशी सेल्फी घेतली ज्यात इतर लोक नाहीत.

इटलीच्या दौऱ्यावर -थरूर सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. याबद्दल ट्विटरवर थरूर सातत्याने पोस्ट करत आहेत. अनेकदा त्यांच्या थरूर चाहत्यांसोबत, सेलिब्रिटींसोबत सोशल मीडियावर सेल्फी शेअर करतात. महिलांसोबतच्या त्याच्या छायाचित्रांमुळे थरूर कायम चर्चेत असतात. काही यूजर्सचे म्हणणे आहे की, शशी थरूर हे एकटेही सेल्फी घेऊ शकतात. तर काहींनी लिहले आहे की, तुम्ही थरूर यांच्या जुन्या गोष्टी विसरू वाही शकत.

याशिवाय ट्विटर वापरकर्त्यांना त्याच्या सेल्फीमध्ये राष्ट्रीय ध्वज उलटा दिसत आहे. त्यामुळे यूजर्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. ट्रोल करणाऱ्यांसोबतच ते भाजप नेत्यांच्याही निशाण्यावर आले. अनेक यूजर्सने त्याचे उलटे चित्र पोस्ट करण्यास सुरुवात केली. लडाखमधून भाजपचे निवडून आलेले खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी शशी थरूर यांचा उलटा फोटो ट्विट केला आहे. तसेच फोटोत तिरंगा सरळ असावा असे त्यांनी पोस्टमध्ये लिहले आहे.

हेही वाचा- Women Protest March : नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शने

ABOUT THE AUTHOR

...view details