महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Interaction Porters : देशाचं ओझं वाहणारे आज सक्तीनं ओझ्याखाली दबले, हमालांच्या दुर्व्यवस्थेबद्दल राहुल गांधींची खंत - Congress MP Rahul Gandhi

Rahul Gandhi Interaction Porters : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी आनंद विहार रेल्वे स्थानकावरील हमालांशी संवाद साधतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हमाल भारतातील सर्वात मेहनती लोकांपैकी एक आहेत. मात्र महागाईमुळं त्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यांना कोणत्याच सरकारच्या कोणत्याच सुविधा मिळत नसल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi Interaction Porters
Rahul Gandhi Interaction Porters

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 9:16 PM IST

नवी दिल्लीRahul Gandhi Interaction Porters : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी रेल्वे स्थानकावरील हमालासोबतच्या भेटीचा व्हिडिओ जारी केला. 'महागाई' 'विक्रमी' असल्याचे सांगत त्यांनी बेरोजगारीचे मुद्दे उपस्थित केले. ओझं वाहणारे आज मजबूरीच्या ओझ्याखाली दबले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी आनंद विहार रेल्वे स्थानकावर हमालांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. राहुल गांधी यांनी बुधवारी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या भेटीचा व्हिडिओ जारी केलाय.

हमाल सर्वात मेहनती लोक :मी काही दिवसांपूर्वी रामेश्वर (भाजी विक्रेते) यांना भेटलो. याची माहिती मिळताच काही हमाल बांधवांनी मला भेटण्याची विनंती केली. संधी मिळताच मी दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलला पोहोचलो. मी त्यांना भेटलो, त्यांच्याशी संवाद शाधला. त्यांचं जीवन जवळून जाणून घेतलं. त्यांचा संघर्ष समजून घेतला. हमाल हे भारतातील सर्वात मेहनती लोकांपैकी एक आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

पिढ्यानपिढ्या ते लाखो प्रवाशांना त्यांच्या प्रवासात मदत करण्यात आपलं आयुष्य घालवतात. बर्‍याच लोकांच्या हातावरील तो बिल्ला ही केवळ ओळख नसून, त्यांना मिळालेला वारसाही आहे- काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी

दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठी धडपड : आज भारतातील लाखो सुशिक्षित तरुण रेल्वे स्थानकांवर हमाल म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील साक्षर नागरिक दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठी धडपडत आहेत. यावरून देशात बेरोजगारीनं कळस गाठल्याचं दिसून आल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. आमचे हमाल बांधव रोज 400 ते 500 रुपये कमावतात, ज्यातून घरखर्चही भागत नाही. बचतीचा प्रश्नच येत नाही. अन्न महाग आहे, निवास महाग आहे, शिक्षण महाग आहे, आरोग्य महाग आहे, मग अशा गरिबांनी कसं जगायचं?' असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय. 'हमाल भारतीय रेल्वेचे पगारी कर्मचारी नाहीत, त्यांना पगार किंवा पेन्शन नाही! कोणत्याही वैद्यकीय विम्याचा किंवा अगदी मूलभूत सुविधांचाही लाभ नाही, भारताचा भार वाहणाऱ्यांचे खांदे आज मजबुरींमुळे झुकले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

  • परिस्थिती कठीण, मात्र काळ बदलणार : आशा आहे की काळ बदलेल पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, परिस्थिती कठीण आहे, परंतु कोट्यवधी भारतीयांप्रमाणेच पुढील काळ बदलेल अशी मला अपेक्षा आहे. ‘भारत जोडो यात्रा’ संपल्यानंतर राहुल गांधी समाजातील विविध स्तरातील लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. राहुल गांधींचा प्रवास सुरूच असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.

हेही वाचा -

  1. Supriya Sule Vs Sunetra Pawar: निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळेंची होणार का लढत? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांच मत
  2. Rahul Narvekar Foreign Tour : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर
  3. NCP Mumbai President : अजित पवार गटाचा मुंबईचा कारभार समीर भुजबळांकडं?

ABOUT THE AUTHOR

...view details