नवी दिल्ली Rahul Gandhi On Modi :जात जनगणना करण्याच्या मागणीवरून केंद्र सरकार लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलाय. ते आज दिल्लीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधत होते. देशातील महिला आरक्षणाला 'दिरंगाई' केल्याबद्दल राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली आहे. महिला आरक्षण विधेयकाची तातडीनं अंमलबजावणी करावी, अशी मागणी काँग्रेस त्यांनी शुक्रवारी केली. जात जनगणनेच्या मागणीवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारला महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं काम मोदी सरकार करत असल्याचंही गांधी यांनी म्हटलंय.
ओबीसींचे तीनच कॅबिनेट सचिव कसे :महिला आरक्षण विधेयक चांगली गोष्ट आहे, परंतु केंद्र सरकारनं यात जात जनगणना आणि मतदारसंघ फेररचना-विभाजन अटी काढून टाकायला हव्या असं देखील गांधी यांनी म्हटलय. या विधेयकाद्वारे सरकार केवळ नागरिकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ओबीसींबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान ओबीसींसाठी खूप काम करत आहेत असं ते म्हणतात. ते ओबीसींसाठी इतकं काम करत असतील, तर 90 पैकी तीनच लोक कॅबिनेट सचिव कसे? असा सावाल त्यांनी उपस्थित केलाय.