महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Congress MLAs oath : गोव्यात काँग्रेसच्या आमदारांनी शपथ मोडून केला भाजपात प्रवेश

गोव्यात काँग्रेसच्या आमदारांनी शपथ मोडून भाजपात प्रवेश केला (Congress MLAs broke their oath and joined BJP In Goa) गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत त्या पैकी ८ आमदारांनी भाजपात प्रवेश (Entry of MLAs into BJP) केला. विधानसभा निवडणुकीच्यावेळी याच उमेदवारांनी मंदिर, मशीद आणि चर्चमध्ये जाऊन पक्ष सोडणार नसल्याची शपथ घेतली होती.

Congress MLAs oath
काँग्रेस आमदारांची शपथ

By

Published : Sep 14, 2022, 2:25 PM IST

Updated : Sep 14, 2022, 2:37 PM IST

पणजी: यावर्षी झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी मंदिर, चर्च व मशिदीत जाऊन निवडून आल्यानंतर पक्ष सोडणार नसल्याची शपथ घेतली होती. पुढे काँग्रेसने आमदार भाजपात जाऊ नये म्हणून काही काळ निवडून आलेल्या आमदारांना अज्ञातवासामध्ये देखील नेऊन ठेवले होते. असे असताना आता काँग्रेस आमदारांनी शपथ मोडून भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेस आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे राज्यात भाजप अधिक मजबूत झाली असून, या आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला बळकटी मिळाली असून आगामी लोकसभेत आपण 400 हून अधिक जागा जिंकणार असून त्यातील गोव्यातील दोन्ही जागांचा समावेश असणार असल्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

विधानसभा निवडणुका होऊन अवघे सहा महिने उलटत नाहीत तोवर या सर्व आमदारांपैकी आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला मात्र. आज या आमदारांना या शपथ बद्दल विचारले असता आम्ही देवाकडे जाऊन कौल घेतला आणि देवाने आम्हाला भाजपा पक्षात जायला सांगितले असे गोव्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपात प्रवेश केलेले काँग्रेस आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. बुधवारी सकाळी काँग्रेसच्या 11 पैकी आठ आमदारांंनी भाजप प्रवेश केला व दोन तृतीयांश आमदारांनी भाजपा प्रवेशाचे पत्र विधानसभा सचिवांना सुपूर्द केले.

राज्यात काँग्रेसचे 11 आमदार निवडून आले होते यापैकी य आठ आमदारानी आपला वेगळा गट स्थापन करून भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभेत मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांची भेट घेतल्यानंतर सर्व आमदारांनी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजपचा पक्षप्रवेश उरकून घेतला. प्रवेशानंतर बोलताना माजी विरोधी पक्ष नेते माइकल लोबो यांनी स्पष्ट केले की, देशात राहुल गांधी भारत जोडो यात्रा करीत आहेत मात्र यात्रा करत असताना काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे पक्षातील मोठे नेते काँग्रेसला सोडचिट्टी देत आहेत, त्यामुळे आपणही पक्षाला रामराम करून भाजप प्रवेश करत आहोत. काँग्रेस आमदार पक्ष प्रवेशामुळे भाजपची संख्या सध्या 33 वर पोहोचली असून राज्यात आता विरोधी पक्ष कमकुवत झाल्याचं दिसून येते.

Last Updated : Sep 14, 2022, 2:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details