महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Karnataka Congress: विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याचे सर्व अधिकार मल्लिकार्जुन खरगेंकडे, बैठकीत झाला निर्णय - decision of the AICC President

कर्नाटक विधानसभेतील दणदणीत विजयानंतर पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने निर्णय होईल अशी परिस्थिती नाही. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाली नाही. आता हा काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

By

Published : May 14, 2023, 10:56 PM IST

Updated : May 14, 2023, 11:02 PM IST

काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटकातील नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांनी आज रविवार झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याचे पुर्ण अधिकार दिले आहेत. पक्षाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आज सायंकाळी येथील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्याचे अधिकार पक्षाध्यक्षांना देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांची भेट घेतली.

डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेत्याची निवड करण्यासाठी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंग आणि दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. राज्यातील 224 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा जिंकल्या, तर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) 66 आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दलने (सेक्युलर) 19 जागा जिंकल्या.

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला ठराव : राज्यातील जनतेला दिलेल्या पाच हमी योजना काँग्रेस पक्ष राबवणार आहे. कठोर परिश्रम आणि कर्नाटकातील जनतेला जबाबदार, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासन देण्यासाठी एकजुटीने दृढनिश्चय. राज्यातील 6.5 कोटी कन्नडिगांची सुरक्षा आणि सेवा याला प्राधान्य असेल. सामाजिक न्याय, आर्थिक समता हे सरकारच्या धोरणांचे मूळ उद्दिष्ट असेल. याशिवाय नजीकच्या काळात सरकारने सार्वजनिक कल्याणासाठी बनवलेले प्रत्येक धोरण राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे व कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी निश्चित केले जाईल. तसेच, कर्नाटकची संस्कृती, भाषा आणि महान वारशाचे रक्षण करणे हे पहिले कर्तव्य आहे आणि कर्नाटकची शांतता पुन्हा प्रस्थापित करणे हेही धोरण पक्षाने आखले आहे.

हायकमांड निर्णय घेईल : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) निरीक्षक कर्नाटकातील पक्षाच्या आमदारांचे मत हायकमांडपर्यंत पोहोचवतील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत निर्णय घेतला जाईल. विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी सर्व काही ठीक चालले असून, लवकरच सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले. कर्नाटकातून दुपारी खरगे दिल्लीला परतले. राज्यातील जनतेची सेवा करणे हे काँग्रेसचे प्राधान्य आहे. पक्षाला कोणी मत दिले की नाही, याने पक्षाला काही फरक पडणार नाही, असही ते म्हणाले आहेत. दरम्यान, आमचे निरीक्षक बेंगळुरूला गेले आहेत. त्यांची बैठक होईल, त्यानंतर जे काही मत तयार होईल, त्याची माहिती हायकमांडला दिली जाईल. त्यानंतर हायकमांड निर्णय घेईल असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा :Mallikarjun Kharge: मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले अन् पक्षाने कात टाकली, वाचा ईटीव्हीचा रिपोर्ट

Last Updated : May 14, 2023, 11:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details