महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Devendra Fadnavis : काँग्रेसवाल्यांना स्मृतिभ्रंश, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Congress is suffering from amnesia

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे प्रचार सभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. काँग्रेसवाल्यांना स्मृतिभ्रंश झाल्याची टीका फडणवीसांनी काँग्रेसवर केलीय.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 10:55 PM IST

बुरहानपूरDevendra Fadnavis :भाजपाच्या उमेदवार अर्चना चिटणीस यांच्या समर्थनार्थ रॅलीला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी शहापूरला पोहोचले. रॅलीनंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, काँग्रेसला गजनी चित्रपटाप्रमाणं स्मृतिभ्रंशाचा त्रास होतो. तसंच, उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी, शिवराज सरकारचं कौतुक केलंय.

काँग्रेसजनांना स्मृतीभ्रंशाचा त्रास : काँग्रेसनं तुमच्या गावात शाळा, रुग्णालय, तलाव बांधणार असल्याचं सांगितलं. आमच्या गावात नदी, नाले नाहीत, असा सवाल नागरिकांनी काँग्रेसला केला. त्यावर काँग्रेसवाले म्हणाले काही हरकत नाही, आधी नदी-नाले बांधू, मग तलाव बांधू. यावरून असं वाटतंय काँग्रेसवाल्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. प्रत्येक भाषणात एक नवीन आश्वासन देतात. निवडून आल्यावर ते सगळं विसरून जातात, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगवालय.

काँग्रेसनं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही :पुढं बोलतानाफडणवीस म्हणाले, राहुल गांधी रोज नवनवी आश्वासनं देतात. त्यांना विचारा, तुम्ही छत्तीसगड, राजस्थानमध्ये आश्वासनं दिली होती. तुम्ही त्यातील कोणतं आश्वासन पूर्ण केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या राजवटीत गरिबांचा विकास होत आहे. पंतप्रधान मोदींनी गरिबांची सेवा केली आहे. शाहपूरमधील दोन हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेची मदत मिळाली आहे. ती आधी का भेटली नाही, असा प्रश्न त्यांनी काँग्रेस सरकारला केला.

मोदी सरकारचं कौतुक : फडणवीस म्हणाले की, आज भारत जगामध्ये आपली प्रतिष्ठा निर्माण करत आहे. आज आपण नवा भारत पाहू शकतो. सहा वर्षांत 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. कल्याणकारी योजना राबवून प्रत्येक गरीबापर्यंत सुविधा भाजपा सरकार देत आहे. राज्य सरकारही पंतप्रधान मोदींच्या खांद्याला खांदा लावून पुढं चालत आहे. जिथं दुहेरी इंजिनचं सरकार धावतं तिथं विकास होतो, असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा -

  1. Jayant Patil On NCP Hearing : अजित पवार गटानं डिलिव्हरी बॉयचं फेक शपथपत्रं केलं सादर - जयंत पाटील
  2. Diwali 2023 : दिवाळीत फटाके फोडण्याची वेळ दोन तासांवर, पहाटे फटाके वाजवायचेच नाही - उच्च न्यायालय
  3. Historical School In Mumbai : मुंबापुरीत 132 वर्षापासून सुरू आहे ऐतिहासिक शाळा; अभिनेता स्वप्निल जोशीनंही घेतलं शिक्षण, जाणून घ्या शाळेचा इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details