नवी दिल्ली -काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज शुक्रवार (दि. 8 जुलै) रोजी एम्समध्ये आरजेडीचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. राहुल गांधी आणि लालू यादव यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. राहुल गांधी यांनी लालू यादव यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत - आज दुपारी 1.15 वाजता राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी एम्समध्ये पोहोचले होते. लालू यादव आणि राहुल गांधी यांची ही भेट राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाची आहे, कारण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. आरजेडी प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. लालूजी आता पलंगावरून उठून बसू शकतात, असे त्यांची मुलगी मिसा भारती यांनी दिली आहे.