पणजी- गोवा विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly 2022 election update ) पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या राणे पिता-पुत्रांच्या वादावर ( Rane Father Son in Goa election ) अखेर पडदा पडला. निवडणुकीच्या रिंगणातून प्रतापसिंह राणे यांनी माघार घेतली ( Pratap Singh will not contest election ) आहे.
आपल्याला तिकीट मिळालेच नाही
माजी मुख्यमंत्री आणि पर्येंचे आमदार वडील प्रतापसिंह राणे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवू नये, अशी इच्छा त्यांचे पुत्र आरोग्यमंत्री विश्वजित राणे ( Vishwajit Rane on father as candidate ) यांनी व्यक्त केली होती. मात्र, विधानसभा निवडणूक लढविण्याचा मागणीवर प्रतापसिंह राणे ठाम राहिले होते. आगामी विधानसभा निवडणूक सिनियर राणे अर्थातच वडील प्रतापसिंह राणे यांच्याविरोधात लढविणार असल्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले होते. यानंतर एका राजकीय वादाला सुरुवात झाली होती. हा वाद वडील विरुद्ध मुलगा यापेक्षा भाजप विरुद्ध काँग्रेस असा रंगला होता.
हेही वाचा-Goa Assembly Elections 2022 : डिचोली मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला, काँग्रेस कमकुवत