नवी दिल्ली -काँग्रेसचे वरिष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसमध्ये कोणीही अध्यक्ष नाही. मात्र, निर्णय कोणीतरी घेत असल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या हायकमांडने काँग्रेस कार्यकारी समितीची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
काँग्रेसचे वरिष्ठ नेता कपिल सिब्बल म्हणाले, की लोक काँग्रेस सोडून जात असल्याने आपल्यावरच प्रश्न उपस्थित होत आहेत. यांचे खास असलेल्या लोकांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. जितीन प्रसाद आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेस सोडून गेले आहेत. त्यांनी परत यावे. कारण, काँग्रेसची विचारसरणी हा देशाचा पाया आहे. त्याच्या आधारावर आपली प्रजासत्ताक व्यवस्था अस्तित्वात आली होती. या व्यवस्थेला काँग्रेस टिकवू शकते.
हेही वाचा-ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा; शिवसेना विधानसभेच्या 22 जागांवर निवडणूक लढविणार- संजय राऊत
काँग्रेस मजबूत झाली तरच विरोधी पक्ष मजबूत होणार
सिब्बल म्हणाले, की आम्ही मागण्या मांडत राहू. सिब्बल म्हणाले की, संसद चालू असताना अनेक मुद्द्यांवर चर्चा होते. विरोधी पक्ष मजबूत असेल तरच प्रश्न उपस्थित केले जातात. काँग्रेस मजबूत झाली तरच विरोधी पक्ष मजबूत होणार आहे. हे घडणार नसेल तर प्रश्न कसे विचारले जाणार आहेत? काँग्रेसचे नुकसान म्हणजे देशाचे नुकसान आहे. कोणताही पक्षाचा कार्यकर्ता हा कोणा विरोधातही असू शकत नाही. आम्हीदेखील काँग्रेसमध्ये आहोत.