महाराष्ट्र

maharashtra

'भारत महान नाही, तर बदनाम'; कमलनाथांच्या वक्तव्यानंतर एमपीचे वातावरण तापले

By

Published : May 28, 2021, 10:26 PM IST

काही दिवसांपूर्वी कमलनाथ यांनी देशातील वाढत्या कोरोना परिस्थितीबाबत सरकारवर टीका केली होती. यासोबतच त्यांनी भारत महान नाही, तर बदनाम आहे असे वक्तव्यही केले होते. यावरुन भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

kamalnath not fit to be called citizen of india allaged cm shivraj singh chuhan
'भारत महान नाही, तर बदनाम'; कमलनाथांच्या वक्तव्यानंतर एमपीचे वातावरण तापले

भोपाळ :मध्य प्रदेशमध्ये कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिक एकीकडे त्रस्त आहेत, तर दुसरीकडे नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देशातील कोरोना परिस्थितीबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. "भारत महान नाही, तर बदनाम आहे" असा प्रकारचे वक्तव्य कमलनाथ यांनी केले होते. त्यावरुन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी कमलनाथ यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कमलनाथ हे भारतीय म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत, अशी टीका शिवराज यांनी केली आहे.

'भारत महान नाही, तर बदनाम'; कमलनाथांच्या वक्तव्यानंतर एमपीचे वातावरण तापले

कमलनाथ यांच्यावर टीकेची झोड..

काही दिवसांपूर्वी कमलनाथ यांनी देशातील वाढत्या कोरोना परिस्थितीबाबत सरकारवर टीका केली होती. यासोबतच त्यांनी भारत महान नाही, तर बदनाम आहे असे वक्तव्यही केले होते. यावरुन भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कमलनाथ यांनी हे वक्तव्य विदेशामध्ये भारतातील कोरोनाबाबत काय बोलले जाते याबाबत सुरू असलेल्या चर्चेवेळी केले होते. आधी कोरोनाच्या चायनीज व्हेरिएंटबाबत जगभरातील लोक बोलत होते, मात्र आता भारतीय व्हेरिएंटबद्दल बोलत आहेत असे कमलनाथ म्हटले होते. यावरुनही भाजपा नेत्यांनी कमलनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्री शिवराज यांनी तर कमलनाथ यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका केली होती.

सोनिया गांधींकडून मागितले उत्तर..

यानंतर शिवराज सिंह यांनी सोनिया गांधींना याप्रकरणी आपले मत मांडण्याचे आवाहन केले आहे. कमलनाथ यांच्या वक्तव्याचे त्या समर्थन करतात की विरोध हे त्यांनी स्पष्ट करावे. सत्ता गेल्यानंतर कमलनाथ यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. इतके, की ज्या मातीमध्ये जन्म घेतला त्या देशाचीच बदनामी ते करत आहेत. काँग्रेसचीही हीच विचारसरणी आहे. त्यामुळे सोनियांनी आपले मौन सोडून, उत्तर द्यावे. जर सोनिया गांधी कमलनाथ यांच्या वक्तव्याशी असहमत आहेत, तर त्यांनी कमलनाथ यांना तातडीने पक्षातून बाहेर काढावे. अन्यथा सोनियांचाही कमलनाथ यांना पाठिंबा आहे, असे आम्ही समजू असेही शिवराज म्हणाले.

सरकार कोरोना बळींची संख्या लपवत आहे - कमलनाथ

दरम्यान, कमलनाथ यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सरकार कोरोना बळींची खरी संख्या लपवत असल्याचे कमलनाथ यांचे म्हणणे आहे. कमलनाथ यांनी दावा केला होता, की एमपीमध्ये मार्च आणि एप्रिलमध्येच एक लाखांहून अधिक कोरोना बळी गेले आहेत. मात्र, त्यांच्या या दाव्याला एमपी सरकारने फेटाळले आहे. कमलनाथ हे चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोपही राज्य सरकारने केला आहे.

हेही वाचा :गोव्यातील २३ न्यायाधीशांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या, मुंबई उच्च न्यायालयाकडून आदेश जारी

ABOUT THE AUTHOR

...view details