नवी दिल्ली:काँग्रेस मधील एका गटाने पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची निराशाजनक कामगिरी "गंभीर चिंतेचा विषय" असल्याचे म्हटले होते. कार्यकारिणीच्या बैठकीच्या ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि इतर काही सदस्य ज्यांना काॅंग्रेसचा असंतुष्ठ गट जी-23 असे संबोधले जाते ते आज पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. "सोनिया गांधींशी बोलल्यानंतर आझाद आणि इतर जी-23 च्या इतर नेत्यांसोबत बैठक ठरवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी फक्त आझाद सोनिया गांधींना भेटणार होते. पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या पराभवाबाबत चर्चा करण्यासाठी जी-23 च्या नेत्यांनी,पक्षात व्यापक सुधारणांचे आवाहन केले, तसेच बुधवारी पक्षाचे नेते कपिल सिब्बल, भूपिंदरसिंग हुड्डा, आनंद शर्मा, मनीष तिवारी, शशी थरूर, मणिशंकर अय्यर, पीजे कुरियन, प्रनीत कौर, संदीप दीक्षित आणि राज बब्बर यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली होते.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी गुरुवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. नवी दिल्लीतील आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या निवडणुकीतील पराभवाबाबत गटाच्या बैठकीनंतर जी 23 चे नेते हुड्डा यांनी काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी हुड्डा यांना जी-23 नेत्यांची बैठक आणि त्यांच्या ठरावाबाबत विचारणा केली. हुड्डा यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या निवडणुका आणि भविष्यातील निर्णय केवळ कार्यकारणी मध्ये चर्चेद्वारे घेण्याचे सुचवले कारण जी-23 गटानेही याचा उल्लेख केला होता.
यातच आज गुलाम नबी आझाद यांनी त्यांची भेट घेतली भेटी नंतर त्यांनी स्पष्ट केले की, सोनिया गांधी यांची भेट चांगली झाली. काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला की त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, 5 राज्यांतील पराभवाच्या कारणांवर कार्यकारिणीकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचा पराभव करण्यासाठी एकदिलाने लढण्याबाबत चर्चा झाली.आमच्याकडच्या काही सूचना आम्ही केल्या आहेत.