Congress Manifesto in UP : काँग्रेसचे युवा घोषणापत्र प्रसिद्ध; 20 लाख तरूणांना देणार रोजगार - काँग्रेस 20 लाख तरूणांना देणार रोजगार
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पक्ष कार्यालयात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तरूणांना रोजगार, शिक्षण, आरक्षण आणि महिला सक्षमीकरणावर काँग्रेसने अधिक भर दिला आहे. शिवाय रोजगाराचा ढाचाही प्रियंका गांधींनी सांगितला आहे. प्रियंका गांधी यांनी काँग्रेसचे घोषणापत्र वाचून दाखवले.
नवी दिल्ली - 10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीला सुरूवात होणार आहे. भाजपा आणि समाजवादी पक्षात मुख्य लढत असली तरी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पक्ष कार्यालयात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध ( Congress Manifesto in UP ) केला आहे. तरूणांना रोजगार, शिक्षण, आरक्षण आणि महिला सक्षमीकरणावर काँग्रेसने अधिक भर दिला आहे. शिवाय रोजगाराचा ढाचाही प्रियंका गांधींनी सांगितला आहे. प्रदेशातील 20 लाख तरूणांना रोजगार देण्यासह तरूणांना उद्योग सुरू करण्यासाठी पाच लाख रूपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रियंका गांधी यांनी काँग्रेसचे घोषणापत्र वाचून ( Congress launch Manifesto in Utter Pradesh ) दाखवले. त्यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे -
- 35 हजार माध्यमिक तर आठ हजार उच्च शिक्षण शिक्षकांची भरती
- सहा लाख डॉक्टरांची पदे भरणार
- एक लाख पोलिसांचे पदे भरणार
- 20 हजार अंगणवाडी सेविका आणि 27 हजार अंगणवाडी मदतनीस
- 2 हजार संस्कृत विद्यालयातील शिक्षकांची नोकरभरती करणार
- रिक्त असलेल्या ऊर्दु शिक्षकांची भरती करणार
- एक उत्पादन एक जिल्हा अंतर्गत क्लस्टर तयार करून युवकांना रोजगार देणार
- भरतीमध्ये पारदर्शकता आणून परिक्षेचे निश्चित वेळापत्रक जाहीर करणार
- परीक्षेचे अर्ज शुल्क पूर्णपणे माफ
- परीक्षा भरतीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च मोफत
- पेपर फुटीवर आळा आणणार, अन्यथा कडक कारवाई करणार
- 69 हजार शिक्षकांच्या घोटाळ्यावर कारवाई करणार
- शिक्षणाचे बजेट कमी केले आहे. सत्तेत आल्यास बजेट वाढवणार. महाविद्यालयांमध्ये नोकरीसाठी कॅम्पस आणणार.
- सर्व महाविद्यालयात निवडणुकी सुरू ठेवणार तसेच शिष्यवृत्तींसाठी नवीन योजना आणणार
- ग्रामीण तरूण व्यापारात सहभागी करणे आणि प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठाची स्थापना करणार
- तरूणांना उद्योग सुरू करण्यासाठी एक टक्का व्याजाने पाच लाखपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणार
- प्रदेशात प्रत्येक वर्षी युथ फेस्टीवल राबवणार
- क्रिकेटसाठी विश्व स्तरीय अकॅडमी सुरू करणार