महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Congress Presidential Elections 2022 : काँग्रेसकडून अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; 'या' तारखेला होणार मतदान - काँग्रेसने अध्यक्षपद निवडणुकीच्या अधिसूचना

काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षाध्यक्ष पद निवडणुकीच्या अधिसूचना जारी केल्या आहेत. 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या Congress issued notification for presidential elections कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल होतील.

Congress Presidential Elections 2022
Congress Presidential Elections 2022

By

Published : Sep 22, 2022, 12:17 PM IST

Updated : Sep 22, 2022, 5:34 PM IST

मुंबई - काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षाध्यक्ष पद निवडणुकीच्या अधिसूचना जारी केल्या आहेत. 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या Congress issued notification for presidential elections कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल होतील. गरज भासल्यास 17 ऑक्टोबर रोजी मतदान होईल आणि 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहेत. तसेच, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झाली. पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने ही अधिसूचना जारी केली आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार, अधिसूचना जारी झाल्यानंतर आता 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल. अधिसूचना जारी होण्याच्या एक दिवस अगोदर बुधवारी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी 22 वर्षांनंतर देशातील सर्वात जुन्या पक्षाचे अध्यक्षपद निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जाईल, असे स्पष्ट संकेत दिल्यानंतर ही शक्यता बळकट झाली आहे.

गेहलोत म्हणाले की, मला पक्षाचा निर्णय मान्य असेल, पण त्याआधी राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्याचा शेवटचा प्रयत्न करू. दुसरीकडे, लोकसभा सदस्य थरूर, जे आधीच निवडणूक लढवणार असल्याचे संकेत देत आहेत, त्यांनी बुधवारी काँग्रेस मुख्यालय गाठले आणि पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांची भेट घेतली आणि उमेदवारी प्रक्रियेची माहिती घेतली अशी माहिती घेतली आहे.

Last Updated : Sep 22, 2022, 5:34 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details