महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गरीबांना महिन्याला सहा हजार द्या; सोनिया गांधींचे मोदींना पत्र - सोनिया गांधींची कोरोना लसीकरणावर प्रतिक्रिया

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. लसीकरणासाठी वयाची अट न ठेवता. गरजेनुसार लसीकरण करावे, असे सोनिया गांधींनी पत्रात म्हटलं आहे. तसेच गरिबांना मदत म्हणून महिन्याला सहा हजार रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Sonia Gandhi -PM Modi
सोनिया गांधीं-नरेंद्र मोदी

By

Published : Apr 12, 2021, 9:06 PM IST

नवी दिल्ली -देशात कोरोना उद्रेक झाला असून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. लसीकरणासाठी वयाची अट न ठेवता. गरजेनुसार लसीकरण करावे, असे सोनिया गांधींनी पत्रात म्हटलं आहे. तसेच गरिबांना मदत म्हणून महिन्याला सहा हजार रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

सोनिया गांधींचे मोदींना पत्र, पान क्रमांक १

राज्यातील कोरोनाचा प्रसार पाहून लसी उपलब्ध करून द्याव्यात. कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे नाइट कर्फ्यू लावण्यात येत आहे. यामुळे गरिबांचे हाल होत आहेत. या परिस्थितीमध्ये मदत म्हणून त्यांना महिन्याला सहा हजार रुपये द्यावेत, असे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच काँग्रेस शासीत प्रदेशातील मुख्यमंत्र्यांसोबत सोनिया गांधींनी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. या बैठकीचा संदर्भ देत सोनिया गांधी मोदींना म्हणाल्या, की लसीकरण गरजेचे आहे. अनेक राज्यात लसीचा तुडवडा निर्माण झाला आहे. अनेक राज्यात फक्त तीन ते पाच दिवसांचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे लसीची उत्पादकता वाढवणे गरजेचे आहे. तसेच काही कंपन्यांच्या लसींना आप्तकालीन वापरासाठी मंजूरी देण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

वैद्यकीय उपकरणांना जीएसटीमधून सूट द्यावी -

वयाची अट न ठेवता गरजेनुसार लसीकरण करण्यात यावे. राज्यांना संसर्गाची स्थिती व पुढील अंदाजानुसार लस उपलब्ध करुन देण्यात यावी. कोरोना विषाणूच्या संसर्गाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारी सर्व वैद्यकीय उपकरणे, औषधे व संबंधित पायाभूत सुविधांना जीएसटीमधून सूट देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांना केली.

इंधन दरवाढीवरून मोदींना पत्र -

यापूर्वी सोनिया गांधींनी इंधन दरवाढीवरून मोदींना पत्र लिहले होते. पत्राद्वारे इंधन दरवाढ कमी करून मध्यम वर्गीय आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली होती. इंधन दरवाढीने गाठलेला उच्चांक ऐतिहासिक आणि अव्यवहारिक आहे. देशातील अनेक भागात 100 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहेत. यामुळे देशातील नागरिक त्रस्त झाले आहेत. आंतराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती मध्यम स्तरावर आहेत. विशेष म्हणजे, युपीए सरकारच्या काळापेक्षा आता इंधन तेलाच्या किंमती कमी आहेत, असे त्या म्हणाल्या होत्या.

हेही वाचा -टीएमसी सुप्रिमो ममता बॅनर्जींवर निवडणूक आयोगाची कारवाई, प्रचार करण्यास 24 तासांची बंदी!

ABOUT THE AUTHOR

...view details