पुणे : भारती विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन समारंभ कार्यक्रम भारती विद्यापीठ संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना कर्नाटकमध्ये आमचे सरकार येणार आहे. तसेच, राजस्थानमध्ये देखील पुन्हा आमचेचं सरकार येईल असाही विश्वास त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
आम्ही सर्व कामगार यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली : राजस्थानमध्ये पुन्हा आमची सरकार येणार आहे. कारण आम्ही गुड गव्हर्नर म्हणून काम केलं आहे. पंतप्रधान हे त्यांच्या नेत्यांच्या बोलण्यावर बोलत आहे. आम्ही पाच वर्षात जे आम्ही प्रोजेक्ट केले आहे. ते प्रोजेक्ट वेगवेगळे राज्य आत्ता अमलात आणत आहे. आज आम्ही भारताला विश्र्वगुरू बनवत आहोत. पण भारत तेव्हा विश्र्वगुरू बनेल जेव्हा या देशातील नागरिक हा सुरक्षित राहील. आज आम्ही सर्व कामगार यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. प्रत्येक घर सुरक्षित करण्याचं काम करत आहे असही यावेळी गेहलोत म्हणाले आहेत.