महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेस काळात सिलिंडर घेऊन रस्त्यात बसलेल्या भाजपाच्या नेत्या आता गप्प का, काँग्रेसची टीका - एलपीजीच्या किंमत वाढीवरून काँग्रेसची मोदींवर टीका

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी इंधन दरवाढीवरून भाजपा नेत्या स्मृती ईराणी यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. यूपीए सरकारच्या काळात सिलिंडर घेऊन रस्त्यावर बसलेल्या भाजपाच्या महिला नेत्या आता गप्प का, असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेसची स्मृती ईराणीवर टीका
काँग्रेसची स्मृती ईराणीवर टीका

By

Published : Feb 15, 2021, 8:07 PM IST

नवी दिल्ली - दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमतीत बदल होत आहेत. यावरून काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. सुप्रिया श्रीनेत सोमवारी पत्रकार परिषदेत सिलिंडर घेऊन पोहोचल्या आणि सरकारने वाढविलेले दर त्वरित मागे घेण्याची मागणी केली. तसेच इंधन दरवाढीवरून भाजपा नेत्या स्मृती ईराणी यांच्यावरही त्यांनी नाव न घेता टीकास्त्र सोडले.

इंधन दरवाढीवरून भाजपा नेत्या स्मृती ईराणी यांच्यावर काँग्रेसची टीका

यूपीए सरकारच्या काळात सिलिंडर घेऊन रस्त्यावर बसलेल्या भाजपाच्या महिला नेत्या आता गप्प का, असा सवाल त्यांनी केला. गेल्या 10 दिवसात सरकारने सिलिंडरच्या किंमतीमध्ये 75 रुपयांची वाढ केली आहे. 4 फेब्रुवरीला 25 रुपयांनी तर आता 50 रुपयांनी वाढ केली आहे. आज दिल्लीमध्ये 769 रुपयांना सिलिंडर मिळत आहे, असे त्या म्हणाल्या.

पेट्रोल किंमतीच्या बाबतीत देशाने शतक पार केले आहे. नवा विक्रम नोंदविला याचा सरकारला आनंद आहे. सरकारला सामान्य नागरिकाची काळजी नाही, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेस सरकारच्या काळात सिलिंडरची 10 रुपयांनी किंमत वाढल्यानंतर रस्त्यात सिलिंडर घेऊन बसणाऱ्या नेत्या आज गप्प का आहेत. सत्तेचा आनंद आज इतका मोठा झाला आहे की, त्या एक शब्दही बोलू शकत नाही. मी कुणाबाबत बोलत आहे, तुम्हाला माहित आहे, अशी टीका त्यांनी स्मृती ईराणी यांच्यावर केली.

सध्या केंद्रात मंत्री असलेल्या स्मृती इराणी त्यावेळी कायम आंदोलनात पुढे असायच्या. धरणं आंदोलन असो किंवा मग सरकारविरोधातील घोषणाबाजी इराणी नेहमीच सरकारचा कडाडून निषेध करायच्या. आता इंधन दरवाढीमुळे त्यांच्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details