महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pegasus Snooping : अमित शाहांनी राजीनामा देण्याची काँग्रेसची मागणी; वाचा, काय आहे प्रकरण? - अमित शाह राजीनामा बातमी

हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता एका वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या एका संयुक्त अहवालातून समोर आले आहे.

congress
काँग्रेस

By

Published : Jul 19, 2021, 8:49 PM IST

नवी दिल्ली -हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता एका वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या एका संयुक्त अहवालातून समोर आले आहे. त्यानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, हॅकिंग प्रकरणात सरकारचा हात असून, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी व विरोधी पक्षातील अऩेक नेत्यांचे फोन हॅक करण्यात आल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

हेही वाचा -Pegasus Snooping : काय आहे पेगासस स्पाइवेअर.. काँग्रेसकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तर भाजपकडून सारवासारव

  • मोदींचीही चौकशी करा, काँग्रेसची मागणी -

पेगॅसस प्रकरणावरुन आता विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी इस्रायलचे एनएसओच्या पेगॅससद्वारे ४० हून अधिक भारतीय पत्रकारांचे फोन हॅक केल्याचा दावा केला होता. तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्यापूर्वी मोदींचीही चौकशी झाली पाहिजे. तसेच पेगॅसस प्रकरण पावसाळी अधिवेशनात लावून धरणार असल्याचेही खरगे यांनी सांगितले.

  • रणदीप सुरजेवाला यांची मोदी सरकारवर टीका -

कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, राहुल गांधींची हेरगिरी करण्यात आली आहे. सरकारने स्वतःच आपल्या मंत्र्यांवर हेरगिरी केली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांचीही हेरगिरी सरकारने केली आहे. माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा, अनेक माध्यम संस्था यांचीदेखील हेरगिरी केली असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे. तसेच भाजप आता 'भारतीय हेरगिरी पार्टी' बनली असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले.

राहुल गांधींचा फोन हॅक करून पंतप्रधान मोदी कोणत्या दहशतवादाविरूद्ध लढा देत आहेत? तसेच माध्यम संस्था आणि निवडणूक आयुक्तांची हेरगिरी करून त्यांचा कोणत्या दहशतवाद्यांशी संबंध होता का हे मोदी तपासत होते का? असे अनेक प्रश्नही रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारला विचारले आहेत. राहुल गांधी यांच्या कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांचे फोन हॅक केले आहेत, असा दावाही सुरजेवाला यांनी केला आहे.

  • काय आहे पेगॅसस प्रकरण?

जगभरातील महत्त्वाचे मोबाईल नंबर हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी पेगॅसस या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. पेगॅसस हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे.व्हॉटस अ‍ॅप कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला होता.

  • पेगॅसस फोन हॅक कसे करते?

पेगॅसस अशा पद्धतीने फोन हॅक करते की वापरणाऱ्यांनाही ते कळत नाही. हॅकरला एकदा जो फोन हॅक करायचा आहे त्याची माहिती मिळाली की त्याला एका वेबसाईटची लिंक पाठली जातो. जर युजरने त्या लिंकवर क्लिक केले तर मोबाइलमध्ये पेगॅसस इन्स्टॉल होते.

ऑडिओ कॉल्स तसेच व्हॉट्स अॅपसारख्या अॅपमधील सुरक्षेच्या त्रुटींमधूनही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होते. पेगॅससची पद्धत इतकी गुप्त आहे की, युजरला मिस कॉल देऊनही हॅकिंग केले जाऊ शकते. सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये आलेल्या फोन नंबरची यादीही ते डिलीट करु शकतात. यामुळे युजरला मिस कॉल आल्याचीही माहिती मिळत नाही.

हेही वाचा -देवेंद्र फडवणीसांचे सरकार असताना 'पेगॅसस'चा वापर महाराष्ट्रात केला होता का? - सचिन सावंत

ABOUT THE AUTHOR

...view details