नवी दिल्ली - निवडणूक रणनीतीतज्ज्ञ ( poll manager Prashant Kishor ) प्रशांत किशोर यांची काँग्रेसमधील पक्षाची भूमिका काय, असावी याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या पुनरुज्जीवनाच्या योजनेवर गेल्या आठवडाभरात वरिष्ठ नेत्यांच्या निवडक ( Prashant Kishor role in congress ) प्रशांत किशोर गटाने चर्चा केली आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी ए.के .अँटनी, पी चिदंबरम, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अंबिका सोनी, जयराम रमेश, दिग्विजय सिंग आणि रणदीप सिंग सुरजेवाला व प्रियांका गांधी वड्रा यांचा समावेश असलेल्या समितीसोबत अंतिम निर्णय घेण्यासाठी ( congress committee meeting in Delhi ) विचारविनिमय सुरू केला.
काँग्रेस समितीच्या अंतिम बैठकीत विविध मुद्द्यांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित आहे. गेल्या आठवडाभरात, प्रशांत किशोर यांना सामील करण्यावर व्यापक एकमत झाले ( congress meeting on Prashant Kishor ) आहे. परंतु नेमकी भूमिका आणि जबाबदारी काय द्यावी, याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी सोनिया गांधी यांच्यावर ( Sonia Gandhi responsibility ) सोपविण्यात आली आहे.
प्रादेशिक पक्षांशी संबंध तोडण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी-काँग्रेस प्रमुखांच्या निवासस्थानी बैठकीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. रावदेखील आहे. प्रशांत किशोर यांची पॉलिटिकल अॅक्शन कमिटी ही केसीआर यांच्यासाठीदेखील निवडणुकीत प्रचाराचे काम करत आहे. प्रशांत किशोर यांचे पीएम मोदी, जेडी-यू, वायएसआर काँग्रेस, डीएमके, आप आणि टीआरएस या प्रादेशिक पक्षांशी चांगले संबंध आहेत. हे संबंध तोडावेत असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रशांत किशोर यांना सूचविले होते.
आयपॅक निवडणूक रणनीती-विशेष म्हणजे, रविवारी प्रशांत किशोर यांच्या आयपीएसी ( IPAC TRS join for poll ) ) कंपनीने टीआरएसशी हातमिळवणी केली आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही आयपीएसी टीएमसीबरोबर काम करत ( IPAC with TMC ) आहे. 2021 च्या राज्य निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे किशोर यांनी कामातून विश्रांती घेत असल्याचे जाहीर केले होते.