महाराष्ट्र

maharashtra

Congress Criticizes Modi : मणिपूर हिंसाचारावर मौन बाळगल्याबद्दल काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

By

Published : Jun 18, 2023, 6:06 PM IST

Updated : Jun 18, 2023, 10:33 PM IST

मणिपूर राज्यातील मेईतेई आणि कुकी समुदायाच्या लोकांमधील वांशिक हिंसाचारात 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आज प्रसारीत झालेल्या मन की बात कार्यक्रमात हिंसाचाराबाबत मोंदींनी मौन बाळगल्याबद्दल काँग्रेसने सरकारची खरडपट्टी काढली आहे.

Congress Criticizes Modi
Congress Criticizes Modi

नवी दिल्ली : रविवारी सकाळी प्रसारित झालेल्या 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमात मणिपूरमधील हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगल्याबद्दल काँग्रेसने मोदी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. मणिपूरमध्ये गेल्या महिन्यापासून हिंसाचाराचे सत्र सुरूच आहे. हिंसक आंदोलकांनी केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकले. मात्र घरी कोणी नसल्याने जीवितहानी टळली. परिस्थिती हाताळण्यासाठी इंफाळ पूर्व पोलिसांनी आरके रंजन सिंह यांच्या निवासस्थानाजवळ जमाव पांगवला.

मन की बातवर काँग्रेसची टीका : काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मणिपूरवर आणखी एक मन की बात पण मौन." "आपत्ती व्यवस्थापनातील भारताच्या महान क्षमतेबद्दल पंतप्रधानांनी स्वत:ची पाठ थोपटली. मणिपूरला तोंड देत असलेल्या संपूर्ण मानवनिर्मित मानवतावादी आपत्तीचे काय झाले? असा सवाला त्यांनी उपस्थित केला आहे. मोदींनी कार्यक्रमात एक शब्दही हिंसाचाराबाबत वक्तव्य केले नाही. पंतप्रधानांकडून कोणतेही शांततेचे आवाहन नाही, याचा खेद वाटल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. पीएम-केअर्स फंड खरच मणिपूरची मदत करतो आहे का? हा खरा प्रश्न आहे,” असा सवाल रमेश यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधानांना फटकारले :तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) देखील यावरुन पंतप्रधानांना फटकारले आहे. आता 'मणिपूर की बात' करण्याची वेळ आली आहे. TMC लोकसभा सदस्य महुआ मोइत्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "बस झाली मन की बात, आता मणिपूर की बातची वेळ आली आहे," असे ट्विट त्यांनी केले आहे.

हिंसाचारात 100 हून अधिक मृत्यू : मणिपूरमधील हिंसाचारावर पंतप्रधान मोदींच्या मौनाबद्दल काँग्रेसने वारंवार टीका केली आहे. भारतीय लष्कराने शनिवारी रात्री उशिरा मणिपूरची राजधानी इम्फाळमधील हिंसाचारग्रस्त भागात फ्लॅग मार्च काढला. गेल्या काही दिवसांपासून हाणामारी झालेल्या राज्यात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एक महिन्यापूर्वी ईशान्येकडील राज्यातील मेईतेई आणि कुकी समुदायाच्या लोकांमधील वांशिक हिंसाचारात 100 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

3 मे रोजी हिंसाचाराची सुरवात : मेतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी पहाडी जिल्ह्यांमध्ये 3 मे रोजी 'आदिवासी एकता मार्च'ने आयोजित केलेल्या सभेत गोंधळ झाला होता. त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी 53 टक्के लोकसंख्या मेईटीस यांची आहे. हा समुदाय बहुतेक इम्फाळ खोऱ्यात राहतो.

हेही वाचा -Manipur Violence : मणिपूरमधील समस्या धार्मिक नाही, दंगल गैरसमजातून झाली - केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह

Last Updated : Jun 18, 2023, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details