नवी दिल्ली Congress On Ram Temple: 22 जानेवारी रोजी मंदिरात (Ram Temple) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी मोजक्याच लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Karge) , माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधरी उपस्थित राहणार नाहीत, असं काँग्रेसने बुधवारी स्पष्ट केलं आहे. कारण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक संघाने राम मंदिराला 'राजकीय प्रकल्प' बनवले आहे आणि निवडणुकीच्या फायद्यासाठी अर्ध्या बांधलेल्या मंदिराचे उद्घाटन केलं जात आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या तीन प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
काँग्रेसनं जारी केलं निवेदन : पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका निवेदनात दावा केला आहे की, मंदिराचे बांधकाम अपूर्ण आहे आणि त्याचे उद्घाटन निवडणुकीच्या फायद्यासाठी केले जात आहे. भाजपा आणि आरएसएसच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी खरगे, सोनिया आणि चौधरी यांनी आदरपूर्वक हे निमंत्रण नाकारलं आहे. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 6 हजारांहून अधिक लोकांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.