नवी दिल्ली -पुढील वर्षात उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडमोडींनी वेग घेतला. माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद काँग्रेसला रामराम ठोकत भाजपवासी झाले. पियुष गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
उत्तर प्रदेशातील 2017 विधानसभा निवडणुकीनंतर जितिन प्रसाद भाजपात जाणार अशी चर्चा सुरू होती. तसेच 2019 लोकसभा निवडणुकीनंतरही या चर्चेला उधाण आले होते. प्रियंका गांधी यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर भाजपात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचे बोलले जात होते. मात्र, आज अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला. 2019 मध्ये दुर्लक्ष करून उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांना करण्यात आले होते.