महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'2014 च्या पराभवाला मनमोहन सिंग अन् सोनिया गांधी जबाबदार'; प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून गौप्यस्फोट

राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसेने राजकीय दिशा गमावली, असा दावा प्रणव मुखर्जी यांनी 'द प्रेसिडेंशियल इयर्स' या आत्मचरित्रामध्ये केला आहे. रूपा प्रकाशन द्वारा प्रकाशित त्यांचे 'द प्रेसिडेंशियल इयर्स' हे पुस्तक येत्या वर्षात 2021 मध्ये वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे.

Pranab
प्रणव

By

Published : Dec 12, 2020, 12:32 PM IST

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्या 'द प्रेसिडेंशियल इयर्स' या आत्मचरित्रातील दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसेने राजकीय दिशा गमावली, असा दावा त्यांनी 'द प्रेसिडेंशियल इयर्स' या आत्मचरित्रामध्ये केला आहे. प्रणव मुखर्जी यांनी 31 ऑगस्ट 2020 ला वयाच्या 85 व्या निधन झाले. रूपा प्रकाशन द्वारा प्रकाशित त्यांचे 'द प्रेसिडेंशियल इयर्स' हे पुस्तक येत्या वर्षात 2021 मध्ये वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. आपल्या मृत्यूपूर्वी त्यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.

जर 2004 मध्ये जर मी पंतप्रधान झालो असतो. तर 2014 मध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला नसता, असे पक्षातील काही सदस्यांचे मत होते. मात्र, मी या मताशी जास्त सहमत नाही. मला असे वाटते की, मी राष्ट्रपती झाल्यानंतर पक्षाने आपली राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी पक्ष सांभाळण्यास असमर्थ ठरल्या, असे प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलं.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींं यांची अशी होती राजकीय कारकिर्द

देशाची संपूर्ण व्यवस्था पंतप्रधान आणि प्रशासनाच्या कामकाजाचे प्रतिबिंब असते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग गठबंधन टिकवण्यात मग्न राहिले. त्याचा परिणाम प्रशासनावर झाला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्याच कार्यकाळात प्रशासनाची शैलीचा स्वीकार केल्याचे दिसून आले, असं त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलं. या पुस्तकामध्ये त्यांनी पश्चिम बंगालमधील एका गावापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतच्या आपल्या प्रवासावर प्रकाश टाकला आहे.

पश्चिम बंगालमधील 'या' गावात जन्म -

प्रणव मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती होते. त्यांच्या राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 असा होता. मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 ला पश्चिम बंगाल राज्यातील बिरभूम जिल्ह्यातील मिराची या गावात झाला. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जन्म झाल्यामुळे प्रणव मुखर्जी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील विविध घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. प्रणव मुखर्जी यांचा प्रवास सामान्य नागरिक ते भारताचे राष्ट्रपती असा राहिला.

हेही वाचा -IMA ची POP आज; महाराष्ट्राचे १८ जण होणार लष्करात अधिकारी

ABOUT THE AUTHOR

...view details