महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सलमान खुर्शीदनंतर राशिद अल्वी यांचे वादग्रस्त वक्तव्य, राम भक्तांना संबोधलं दानव - Raashid Alvi Controversy

रामराज्य आणि जय श्री रामचा नारा देणारे ऋषी नसून रामायण काळातील कालनेमी राक्षस आहेत, असे राशिद अल्वी यांनी म्हटलं. त्यावर नवे वांदग निर्माण झाले.

CONG LEADER RASHID ALVI CALLED RAM DEVOTEES A MONSTER IN SAMBHAL UTTAR PRADESH
सलमान खुर्शीदनंतर राशिद अल्वी यांचे वादग्रस्त वक्तव्य, राम भक्तांना संबोधलं दानव

By

Published : Nov 12, 2021, 12:37 PM IST

Updated : Nov 12, 2021, 12:59 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता राशिद अल्वी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जय श्री राम म्हणणाऱ्यांची तुलना त्यांनी रामायणातील कालनेमी राक्षसाशी केली. रामराज्य आणि जय श्री रामचा नारा देणारे ऋषी नसून रामायण काळातील कालनेमी राक्षस आहेत, असे अल्वी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वादाला तोंड फुटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राशिद अल्वीवर पलटवार केला आहे.

अमित मालविय यांनी रशीद अल्वी यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट केला. सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राशिद अल्वी जय श्री राम म्हणणाऱ्यांना निशाचर (राक्षस) म्हणत आहेत. रामभक्तांप्रती काँग्रेसच्या विचारांमध्ये किती विष मिसळले आहे, असे टि्वट मालविय यांनी म्हटलं.

काय म्हणाले अल्वी?

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी देशात रामराज्य असावे, अशी आमचीही इच्छा आहे. पण ज्या राज्यात बकर्‍या आणि सिंह एकाच घाटावर पाणी पितात तेथे द्वेष कसा असू शकतो, असे राशिद म्हणाले. अशात लोकांना सावध राहावं. जय श्री रामचा जप करणाऱ्या लोकांची रामायणातील कालनेमी राक्षसाशी तुलना करून ते म्हणाले की, लक्ष्मण जेव्हा बेशूद्ध पडले होते. तेव्हा, वैद्य यांच्या सांगण्यावरून हनुमानजी संजीवनी बूट घेण्यासाठी हनुमान हिमालयात गेले होते. त्यावेळी राक्षस खाली बसून जय श्री रामचा जयघोष करत होता. जय श्री रामचा नारा ऐकून हनुमानजी खाली आले. आपला मौल्यवान वेळ वाया घालवण्यासाठी त्या राक्षसाने हनुमानजींना जय श्री राम म्हणण्यापूर्वी स्नान करायला पाठवले होते. तेव्हा अप्सरेने हनुमानजींना सांगितले की, तुला स्नान करायला पाठवणारा कोणी ऋषी नाही तर एक भयंकर राक्षस आहे. म्हणूनच प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की जय श्री रामचा जप करणारा कोणताही साधू नाही, तर तो राक्षस आहे ज्याच्यापासून आपण हुशार व्हायला हवे.

Last Updated : Nov 12, 2021, 12:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details