दुर्गापूर (पश्चिम बंगाल): दुर्गापूरमध्ये राहणारे काही तरुण एका विचित्र व्यसनाच्या आहारी गेले आहेत. ही धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. सिटी सेंटर, विधाननगर, बेनाचिटी आणि मुचीपारा, सी झोन आणि ए झोन यांसारख्या शहराच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांत फ्लेवर्ड कंडोमच्या विक्रीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
फ्लेवर्ड कंडोमची विक्री वाढली - एका दुकानदाराने उत्सुकतेपोटी ग्राहकाला विचारले की फ्लेवर्ड कंडोमची विक्री का वाढली आहे? तर त्या तरुणाने सांगितले की तो नियमितपणे कंडोम खरेदी करतो आणि त्याचे पाणी नशा येण्यासाठी पेय म्हणून वापरतो(new drink to getting high in Durgapur). तो म्हणाला, 'आम्ही रात्रभर कोमट पाण्यात कंडोम टाकायचो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तेच प्यायचो. मात्र, ही घटना औद्योगिकनगरीत घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या नव्या क्रेझमुळे शहरवासीय चिंतेत आहेत.
कंडोम रात्रभर कोमट पाण्यात भिजवून पितात - दुर्गापूरमध्ये अनेक खासगी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि इतर महाविद्यालये आहेत. अनेक भारतीय-विदेशी विद्यार्थी येथे येतात. अनेक महिन्यांपासून परिसरातील औषधांच्या दुकानांवर कंडोमची पाकिटे खरेदी करण्याचे प्रमाण पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. दुकानदार म्हणाला, 'मला आश्चर्य वाटू लागले की शहरवासीयांची लैंगिक इच्छा अचानक इतकी कशी वाढली!' सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी हे फ्लेवर्ड कंडोम रात्रभर कोमट पाण्यात भिजवून पितात आणि ते प्यायल्यानंतर ताजेतवाने होतात. त्यातून एकप्रकारची उत्साहपूर्ण नशा येते (condom washed water).