महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन, पार्थिव घरी दाखल; 23 ऑगस्टला अंत्यसंस्कार - कल्याण सिंह यांचे निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्वसनाचा त्रास होता.

former up chief minister kalyan singh
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

By

Published : Aug 21, 2021, 10:00 PM IST

Updated : Aug 22, 2021, 1:41 AM IST

लखनऊ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे नुकतेच निधन झाले. त्याला श्वसनाचा त्रास होता. त्यांच्यावर राजधानीच्या संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (एसजीपीजीआय) उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना पीजीआय लखनऊमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे उपचार केल्यानंतर काही दिवसांनी कल्याण सिंह यांना गाझियाबादच्या कौशांबी यशोदा रुग्णालयात हलवण्यात आले. ऑक्टोबर २०२० मध्ये कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. 3 जुलै 2021 रोजी कल्याण सिंह यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पुन्हा लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते.

पार्थिव निवास्थानी पोहोचले

कल्याण सिंह यांचे पार्थिक लखनऊ येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला जाणार आहे.

23 ऑगस्टला होणार अंत्यसंस्कार

कल्याण सिंह यांचे पार्थिव आज (22 ऑगस्ट) सकाळी 11:00 ते 1:00 या दरम्यान विधानसभेत आणि 1:00 ते 3:00 पर्यंत भाजप प्रदेश पार्टी कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव एअर अॅम्ब्युलन्सद्वारे अलीगढला नेले जाईल. अंतिम संस्कार 23 ऑगस्ट रोजी केले जाणार आहेत.

Last Updated : Aug 22, 2021, 1:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details