महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tirumala Police Evacuated Devotees : दर्शनासाठी ६ तासांची रांग, भाविकांची घोषणाबाजी, पोलिसांनी हुसकावून लावले - भाविकांची घोषणाबाजी पोलिसांनी हुसकावून लावले

तिरुमला येथे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तब्बल सहा तास दर्शनासाठी रांगेत थांबावे लागले. सहा तास पाणीही प्यायला नसल्याने भाविकांचा संताप दिसून आला. यावेळी भाविक व पोलिसांमध्ये शाब्दिक वाद पाहावयास मिळाला.भाविकांना पोलिसांनी मंदिर परिसरातून हुसकावून ( Tirumala Police Evacuated Devotees ) लावले.

भाविकांना पोलिसांनी मंदिर परिसरातून हुसकावून
भाविकांना पोलिसांनी मंदिर परिसरातून हुसकावून

By

Published : Jan 13, 2022, 11:50 PM IST

तिरूपती ( आंध्र प्रदेश ) - तिरुमला येथे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गुरुवारी असुविधेबद्दल घोषणाबाजी करत निषेध केला. भाविकांना सहा तास रांगेत थांबावे लागत असून, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली जात नसल्याचा आरोप भाविकांनी केला. घोषणाबाजी करणाऱ्या भाविकांना पोलिसांनी मंदिर परिसरातून हुसकावून ( Tirumala Police Evacuated Devotees ) लावले.

थिरुमला श्रीवरी मंदिराच्या प्रवेशद्वारावर ( Srivari Mahadwaram In Tirumala ) दर्शनासाठी थांबलेल्या भाविकांनी चिंता व्यक्त केली. स्वामींचे दर्शन खूप उशिरा होत आहे. येथे स्वयंपाकाच्या अनेक समस्या असून, भाविकांसाठी अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात नसल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. लहान मुले असो वा वृद्ध त्यांच्या त्रासाची दखल घेतली जात नसल्याने भाविकांचा संताप दिसून आला. घोषणाबाजी करणाऱ्या भाविकांना पोलिसांनी दमदाटी करून मंदिर परिसराच्या बाहेर काढले. यावेळी भाविक व पोलिसांमध्ये शाब्दिक वाद पाहावयास मिळाला. पोलिसांनी अनुचित वर्तन केल्याची माहिती भाविकांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details