नवी दिल्ली -नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांवरुन भारत सरकार आणि सोशल मीडिया कंपनी ट्विटरमधील संघर्ष अद्याप सुरुच आहे. आता टि्वटरच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील एका व्यक्तीने टि्वटरविरोधात तक्रार दाखल केली आहे. देवी-देवतांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप टि्वटरवर केला आहे. टि्वटरविरोधात कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
आदित्य सिंह देशवाल असे तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. टि्वटर एक हिंदू देवी-देवतांचे एक कार्टून पाहिले. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी संबंधित टि्वटर खाते एका अरमीन नवाबी नावाच्या व्यक्तीचे आहे. ज्यांनी देवी-देवतांचे अपमान करणार कार्टून टि्वट केले होते. संबंधित कार्टून हे जून महिन्यात टाकण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरणी दिल्ली पोलीस चौकशी करणार आहेत.
चाइल्ट पोर्नोग्राफी कंटेट प्रकरण -
चाइल्ड पोर्नोग्राफी कंटेट प्रकरणी जून महिन्यात ट्वीटरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. लहान मुलांसंबंधी अश्लील सामग्री टि्वटरवर पोस्ट केली जात असल्याचे टि्वटमध्ये म्हटलं होते. NCPCR ने दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये औपचारिक तक्रार दाखल केली होती.