मुझफ्फरपूर (बिहार) : बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ), गृहमंत्री अमित शाह ( Home Minister Amit Shah ), अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याविरुद्ध शुक्रवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी-पश्चिम यांच्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. जैतपूर ओपी पोखैरा येथील रहिवासी वकील विनायक कुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाने ही तक्रार सुनावणीसाठी ठेवली असून, त्यासाठी ६ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे.
पीएम मोदींसह अनेक नेत्यांवर तक्रार:विनायक कुमार यांचे वकील सुधीर कुमार ओझा म्हणाले की, तक्रारीत संविधानाचे उल्लंघन आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, देशातील सार्वजनिक संस्थांचे खाजगीकरण करून समानतेचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. यामुळे देशात बेरोजगारी आणि अराजकता वाढली आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी सांगितले की, तक्रारदार अधिवक्ता विनायक कुमार यांच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विरोधात कलम 201, 120B अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 124A आयपीसी. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -Uddhav Thackeray : आताचे मुख्यमंत्री हे शिवसैनिक नाहीत, ते तर दगाबाज.. उद्धव ठाकरे गरजले..