बर्मिंगहॅम :भारताच्या विकास ठाकूरने मंगळवारी वेटलिफ्टिंगच्या 96 किलो गटात रौप्यपदक पटकावले ( Weightlifter Vikas Thakur Won silver Medal ) आहे. त्याने एकूण 346 किलो वजन उचलले. विकासने स्नॅच राऊंडमध्ये 155 किलो आणि क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये 191 किलो वजन उचलले. भारताचे हे 12 वे पदक आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आतापर्यंत 12 पदके मिळाली ( India won 12 medals in Commonwealth Games ) आहेत. भारताने चार सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली आहेत. भारताला वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक 8 पदके मिळाली आहेत. भारताने वेटलिफ्टिंगच्या 10 वजन प्रकारांमध्ये तीन सुवर्ण पदकांसह सात पदके जिंकली आहेत. देश वेटलिफ्टिंगमध्ये कॅनडाच्या पुढे (दोन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य) पदकतालिकेत आघाडीवर आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेतील ठाकूरचे हे दुसरे रौप्यपदक आहे. 2014 ग्लास्गो गेम्समध्येही त्याने दुसरे स्थान पटकावले होते, तर 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे त्याने कांस्यपदक जिंकले होते. समोआच्या डॉन ओपेलोघेने एकूण 381 किलो (171 किलो आणि 210 किलो) वजन उचलून रेकॉर्डब्रेक कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले आणि 2018 च्या कामगिरीत सुधारणा केली, जिथे त्याने रौप्य पदक जिंकले होते.
जाणून घ्या कोणत्या खेळाडूने पदक जिंकले -