बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची 22 वी आवृत्ती बर्मिंगहॅम येथे होत आहे. आज म्हणजेच 30 जुलै, शनिवारी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात रौप्य पदक ( Weightlifter Sanket Sargar won silver medal ) जिंकले. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे पहिले पदक आहे ( India first medal in Commonwealth 2022 ).
महाराष्ट्रातील सांगली येथील रहिवासी असलेल्या संकेत महादेव सरगरने ( Weightlifter Sanket Mahadev Sargar ) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले होते.