बर्मिंगहॅम: भारतीय खेळाडू मुरली श्रीशंकर आणि मोहम्मद अनीस याहिया ( Long jump Player Mohammad Anees Yahia ) यांनी त्यांच्या पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. श्रीशंकरने ( Long jump Player Murali Srishankar ) पहिल्याच प्रयत्नात 8.05 मीटर उडी मारून अंतिम फेरी गाठली.
केरळचा हा 23 वर्षीय खेळाडू भारताकडून पदकाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. आठ मीटरचे पात्रता गुण प्राप्त करणारा तो त्याच्या गटातील एकमेव खेळाडू होता. हा भारतीय खेळाडू आपल्या शानदार प्रयत्नानंतर त्याचे प्रशिक्षक आणि भारतीय प्रेक्षकांमध्ये आनंदाने पोहोचला.
दरम्यान, याहियाने तीन प्रयत्नांत 7.49 मीटर, 7.68 मीटर आणि 7.49 मीटर उडी मारून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. याहियाने दुसऱ्या प्रयत्नात आपली कामगिरी सुधारली आणि आपल्या गटात तिसरे स्थान पटकावले.
पूनम यादव क्लीन अँड जर्कमध्ये अपयशी, पदकाचे स्वप्न भंगले -
स्नॅच फेरीत चमकदार कामगिरी केल्यानंतर पूनमने क्लीन अँड जर्कमध्ये खराब सुरुवात केली. तिने पहिल्याच प्रयत्नात 116 किलो वजन उचलण्याचा निर्णय घेतला, पण ती अपयशी ठरली. यानंतर दुसऱ्या प्रयत्नातही तिला 116 किलो वजन उचलता आले नाही. तिसर्या फेरीत तिने 116 किलो वजन उचलण्यात यश मिळवले, परंतु रेफ्रींनी ती नाकारली. अशाप्रकारे 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पूनम बर्मिंगहॅमहून रिकाम्या हाताने परतणार आहे.
त्याचबरोबर भारताच्या मनप्रीत कौरने गोळाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. मनप्रीत कौरने 16.78 मीटर गोळा फेकत अंतिम फेरी गाठली. तसेच बर्मिंगहॅममध्ये खेळले जात असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा आज 5 वा दिवस आहे. 2 ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी सुवर्णपदक-सामन्यांसह अनेक सामने होणार आहेत. आतापर्यंत भारताच्या खात्यात तीन सुवर्णांसह नऊ पदके जमा झाली आहेत. बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये भारतीय खेळाडूंकडून सांघिक सुवर्णाची अपेक्षा आहे. त्याचवेळी हॉकीमध्ये भारत आणि इंग्लंडचे महिला संघ आमनेसामने येतील.
हेही वाचा -Wi Vs Ind 3rd T20 I : भारत 24 तासांत खेळणार दुसरा टी 20, दीड तास उशिराने सुरु होणार सामना