महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Commonwealth Games 2022 : टेबल टेनिसमध्ये जी साथियानने जिंकले कांस्यपदक; इंग्लंडच्या ड्रंकहिलचा केला पराभव

टेबल टेनिसमध्ये साथियानने पुरुष एकेरीच्या सामन्यात इंग्लंडच्या ड्रंकहिलचा पराभव ( G Sathian defeats Drunkhill in table tennis ) केला. यासह त्याने कांस्यपदक पटकावले आहे.

G Sathian
जी साथियानने

By

Published : Aug 8, 2022, 5:34 PM IST

Updated : Aug 8, 2022, 7:15 PM IST

बर्मिंगहॅम: पुरुष एकेरीच्या टेबल टेनिस सामन्यात जी साथियानने इंग्लंडच्या ड्रंकहिलचा 11-9, 11-3, 11-5, 8-11, 9-11, 10-12, 11-9 असा पराभव केला. यासह त्याने कांस्यपदक पटकावले ( Sathian won bronze medal in table tennis ) आहे. राष्ट्रकुल क्रीडा 2022 स्पर्धेतील हे 58 वे पदक आहे.

या सामन्यात साथियानने चांगली सुरुवात केली आणि पहिले तीन सेट जिंकले. पण त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूने जबरदस्त पुनरागमन करत पुढचे तीन सेट जिंकले. मात्र, अंतिम सेटमध्ये साथियानने बाजी मारत सामना जिंकला.

भारताचे पदक विजेते -

  • 20 सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल फेडरेशन, टीटी पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश, नवीन, भाविना, नीतू, अमित पंघल, नीतुस पंघल. जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन.
  • 15 रौप्य: संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल असोसिएशन, अब्दुल्ला अबोबाकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर.
  • 23 कांस्य: गुरुराजा, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वी शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जस्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोक्स, महिला संघ. संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदाम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, जी साथियान.

हेही वाचा -Commonwealth Games 2022 : पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये पटकावले सुवर्णपदक; कॅनडाच्या मिशेल ली'ला चारली धूळ

Last Updated : Aug 8, 2022, 7:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details