जयपूर -राजस्थानच्या बर्याच भागात बोचऱ्या थंडीची नोंद झाली आहे. चूरू मधील रात्रीचे तापमान वजा 0.3 अंश सेल्सिअस होते.
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील नऊ जिल्हे रविवारपर्यंत शीतलहरीच्या टप्प्यात राहतील. त्यात श्री गंगानगर, हनुमानगड, जैसलमेर, बीकानेर, चूरू, अलवर, भरतपूर, सीकर आणि झुंझुनूचा समावेश आहे.
हेही वाचा -श्रीनगर, जम्मूतील सर्वात थंड रात्र; द्रास येथे तापमानाचा पारा उणे 26.5 अंशांवर