महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हैदराबादमधील सयामी जुळ्या मुलांनी मिळवला बारावीत फर्स्टक्लास - जुळ्या मुलांनी मिळवला बारावीत फर्स्टक्लास

वीणा आणि वाणी या सयामी जुळ्या मुलींनी तेलंगणा स्टेट बोर्ड ऑफ इंटरमिजिएट एज्युकेशनची परीक्षा अर्थात बारावी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. दोघींनीही ६० टक्क्यांहून अधिक मार्कांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली.

http://10.10.50.80:6060//finalout3/odisha-nle/thumbnail/29-June-2022/15686063_265_15686063_1656479061017.png
http://10.10.50.80:6060//finalout3/odisha-nle/thumbnail/29-June-2022/15686063_265_15686063_1656479061017.png

By

Published : Jun 29, 2022, 1:46 PM IST

हैदराबाद (तेलंगणा): हैदराबादमधील सयामी जुळ्या मुलींनी सर्व अडचणीवर मात करुन तेलंगणा इंटरमीडिएट परीक्षा प्रथम श्रेणीतील गुणांसह उत्तीर्ण केली. तेलंगणा स्टेट बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एज्युकेशन (TSBIE) ने मंगळवारी त्यांच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले.

मे महिन्यात घेण्यात आलेल्या TSBIE आंतर प्रथम आणि द्वितीय वर्ष या दोन्ही परीक्षांना नऊ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. उमेदवारांमध्ये वीणा आणि वाणी या सयामी जुळ्या मुली होत्या. ज्यांनी प्रथम श्रेणीतील गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली.

यावेळी तेलंगणाच्या आदिवासी आणि महिला आणि बालकल्याण मंत्री सत्यवती राठोड यांनी वीणा आणि वाणी यांना विशेष शुभेच्छा दिल्या. वीणा आणि वाणीला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. तेलंगणाच्या शिक्षण मंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांनी निकाल जाहीर केला. ज्यामध्ये दुसरी आणि पहिली या दोन्हीतील ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details