महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आता प्या कोका-कोलाचा रेडी टू ड्रिंक चहा, साखर किंवा दुधाची गरज नाही!

Coca Cola Tea : कोका-कोलानं नुकताच भारतात रेडी टू ड्रिंक चहा लॉन्च केला. हा एक प्रकारचा सेंद्रिय चहा असेल. तो दोन फ्लेवर्समध्ये उपलब्ध असणार आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 3:37 PM IST

Coca Cola Tea
Coca Cola Tea

नवी दिल्ली Coca Cola Tea : कोका-कोलाचं नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं ते काळपट लाल रंगाच्या कोल्ड्रिंकचं. मात्र आता भारतीय बाजारात कोका-कोलाचा चहाही येणार आहे. हा चहा बनवण्यासाठी साखर किंवा दुधाची गरज नाही. ते रेडी टू ड्रिंक असेल. 'ऑनेस्ट टी' असं त्याचं नाव आहे.

रेडी-टू-ड्रिंक आइस्ड ग्रीन टी : कोका-कोला इंडियानं नुकतीच 'ऑनेस्ट टी' लाँच करून तयार चहा पेय विभागात प्रवेश करण्याची घोषणा केली. हा ब्रँड कोका-कोलाची उपकंपनी असलेल्या ऑनेस्टच्या मालकीचा आहे. या रेडी-टू-ड्रिंक आइस्ड ग्रीन टी साठी कंपनीनं लक्झमी ग्रुपच्या प्रतिष्ठित दार्जिलिंग टी इस्टेट, मकाईबारी सोबत भागीदारी केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

लक्ष्मी टी कंपनी सोबत करार : कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ऑनेस्ट चहासाठी ऑरगॅनिक ग्रीन टी कोलकातास्थित लक्ष्मी टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या मकाईबारी टी इस्टेटमधून मिळणार आहे. बंगाल ग्लोबल बिझनेस समिट (BGBS) च्या सातव्या आवृत्तीत दोन्ही कंपन्यांमध्ये या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

या दोन व्हॅरियंटमध्ये उपलब्ध असेल : कोका-कोला इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, ग्राहकांना अधिक व्यापक पेय पर्याय उपलब्ध करून देणं ही या टी लॉन्चच्या मागची कल्पना होती. हा एक प्रकारचा सेंद्रिय चहा असेल. २२ नोव्हेंबर रोजी बंगाल ग्लोबल बिझनेस समिट २०२३ च्या दुसऱ्या आणि अंतिम फेरीत बाटलीबंद आइस्ड ग्रीन टी औपचारिकपणे लाँच करण्यात आली. ही ग्रीन टी लिंबू-तुळस आणि आंब्याच्या व्हॅरियंटमध्ये उपलब्ध असेल, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

हेही वाचा :

  1. रेमंड ग्रुपचे मालक गौतम सिंघानिया यांच्या पत्नीनं घटस्फोटासाठी मागितले तब्बल ८००० कोटी रुपये!

ABOUT THE AUTHOR

...view details