महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोहम्मद जुबेर यांनी दिले पोलीस कोठडीला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान - फैक्ट चेक से जुड़ी वेबसाइट Alt news

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला ऑल्ट न्यूजचा सहसंस्थापक मोहम्मद जुबेर याने पोलीस कोठडीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

मोहम्मद जुबेर यांनी दिले पोलीस कोठडीला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान
मोहम्मद जुबेर यांनी दिले पोलीस कोठडीला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान

By

Published : Jun 30, 2022, 3:44 PM IST

नवी दिल्ली: पत्रकार आणि ऑल्ट न्यूज या फॅक्ट चेक वेबसाइटचे संस्थापक मोहम्मद जुबेर यांनी पोलीस कोठडी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात उद्या म्हणजेच १ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. 28 जून रोजी पटियाला हाऊस कोर्टाने झुबेरच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली होती. जुबेरला २७ जून रोजी अटक करण्यात आली होती. जुबेरवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेरला २७ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर 27 जूनच्या संध्याकाळी जुबेरला अटक करण्यात आली. त्यानंतर रात्रीच बुरारी येथील दंडाधिकार्‍यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आले. तेथे दंडाधिकार्‍यांनी एक दिवसाची पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details