भोपाळ- बालाघाट जिल्ह्यातील लांजी नगरपरिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी देवेंद्र मर्सकोले हे बेजबाबदार वागणुकीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातवेईकांना अपशब्द बोलून मारहाण करणारा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुंडागर्दीच असल्याचे म्हटले जात आहे.
लांजीमध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह डॉक्टरांकडे मागितला. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या लांजा नगरपरिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी देवेंद्र मर्सकोले यांनी कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना पोलिसांच्या समोरच मारहाण केली आहे. यावेळी कोणीतरी त्यांचा मोबाईलवरून व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही मर्सकोले यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचे राजकारण आणि प्रशासनात चांगलेच वजन असल्याचे दिसत आहे. उलट मारहाण झालेल्या तरुणालाच दोषी ठरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.
हेही वाचा-नागपुरात २५ वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, सहकारी डॉक्टरला बेड्या