लखनऊ -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यासंदर्भातली माहिती योगींनी ट्विटरद्वारे दिली आहे. दरम्यान, 14 एप्रिलला योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली होती.
योगी आदित्यनाथ यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; ट्विट करून दिली माहिती - सीएम योगी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यासंदर्भातली माहिती योगींनी ट्विटरद्वारे दिली आहे.
योगी आदित्यनाथ यांचे ट्विट
डॉक्टरांच्या देखरेखीनंतर अखेर माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. याकाळात तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छा आणि केलेल्या प्रार्थनांबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो, असे ट्विट मुख्यमंत्री योगी आदित्नाथ यांनी केले आहे. कोरोनाची लागण झाल्याचेही आदित्यनाथ यांनी ट्विट करून सांगितले होते.
Last Updated : Apr 30, 2021, 1:22 PM IST