वाराणसी (उत्तरप्रदेश): मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गुरुवारी संध्याकाळी वाराणसीला पोहोचत आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, दोन दिवसांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देशातील सर्वात लांब क्रूझ सेवेचा शुभारंभ करणार आहेत. याशिवाय गंगेच्या पलीकडे उभारण्यात आलेल्या टेंट सिटीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीत सुरू असलेल्या विकासकामांबाबत गंभीरतेने घेतले आहे. रविवारीच मुख्यमंत्र्यांनी वाराणसीत येऊन तयारीचा आढावा घेतला.
पंतप्रधान करणार विकासकामांची पायाभरणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गंगा विलास क्रूझला आभासी पद्धतीने उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. यासोबतच विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही ते करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाराणसीत येत आहेत. दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्री बाबपूर विमानतळावर पोहोचतील. तेथून सर्किट हाऊसला ते जाणार आहेत. यानंतर भगवान अवधूत पडाव येथील राम आश्रमात ते जातील.
काशी विश्वनाथ मंदिरात घेणार दर्शन: खोजवा येथे श्रीमद्जगद्गुरू रामानंदाचार्य यांच्या ७२३ व्या जयंतीनिमित्त आयोजित श्री भक्तमाळ कथेतही मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. येथील स्वामी डॉ.राम कमलदास वेदांती यांची भेट घेतल्यानंतर ते काशी विश्वनाथ मंदिरात जातील. दर्शन-पूजनानंतर मुख्यमंत्री सर्किट हाऊसमध्ये रात्रीची विश्रांती घेणार आहेत. शुक्रवारी सकाळी रविदास घाटावर एमव्ही गंगा विलासला झेंडा दाखवून टेंट सिटीच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होतील.