महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CM Dhami Wel Comes Kawadiya : कावड यात्रेकरुंचे मुख्यमंत्री धामी यांनी धुतले पाय, रुद्राक्ष माळा देऊन स्वागत - CM Dhami Wel Comes Kawadiya

हरिद्वारमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ( Chief Minister Pushkar Singh Dhami ) यांनी कावड यात्रेत आलेल्या भाविकांचे पाय धुवून स्वागत केले. धामी यांनी त्यांचा रुद्राक्ष पुष्पहार अर्पण करून आणि अंगावरचे वस्त्र परिधान करून त्यांचा सन्मान केला. मुख्यमंत्री धामी यांच्याकडून झालेले स्वागत पाहून भाविकांच्या डोळ्यात आंनदाश्रू आले.

CM Dhami welcomes Kanwariyas
CM Dhami welcomes Kanwariyas

By

Published : Jul 20, 2022, 2:24 PM IST

हरिद्वार : सुमारे दोन वर्षांनी पुन्हा एकदा सुरू झालेल्या कावड यात्रेत हरिद्वारला कावड यात्रेचे ( Kavad Yatra to Haridwar ) सौंदर्य पाहायला मिळाले. बुधवारी मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी ( Chief Minister Pushkar Singh Dhami ) यांनी हरिद्वारमध्ये दूरवरून पाणी भरण्यासाठी येणाऱ्या कावड यात्रेकरुंचे स्वागत व सत्कार केला. हरिद्वार येथील ओम पुलावर आयोजित केलेल्या स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री धामी यांनी भाविकांचे पाय धुतले. शिवाय त्यांना रुद्राक्षाच्या माळा घालून कपडेही दिले. मुख्यमंत्री धामी यांच्याकडून झालेले हे स्वागत पाहून यात्रेकरू भारावले.

CM Dhami welcomes Kanwariyas

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर यावेळी उत्तराखंडमध्येही मुख्यमंत्री धामी शिवभक्त कावड यात्रेकरुंचे स्वागत करत आहेत. बुधवारी पाऊस असूनही धामी हरिद्वारला पोहोचले. धामी यांनी स्वत:च्या हाताने कावड यात्रेकरुंचे पाय धुतले. त्यानंतर त्यांचे पुष्पहार व रुद्राक्ष हार व अंगावरचे वस्त्र अर्पण करून त्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी धामी म्हणाले की, सरकारने यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी सर्व व्यवस्था केल्या आहेत. मार्चपर्यंत राज्याच्या सीमेवरून खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसह अर्धा महामार्ग त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. महामार्गाच्या मार्ग तीनवर कोणत्याही वाहनाला जाण्याची परवानगी नाही.

हेही वाचा -Sri Lankan Presidential Election : रानिल विक्रमसिंघे असणार श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

ABOUT THE AUTHOR

...view details