पणजी : गोव्यातील विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) जवळ आलेली असताना काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उमेदवारांनी पक्ष आणि गोव्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ राहुल गांधींच्या उपस्थितीत घेतली. यावरून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Goa CM Pramod Sawant ) यांनी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली ( Pramod Sawant Criticized Congress GFP ) आहे. ज्यांनी शपथ घेतली त्यांना वेळोवेळी काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागेल. ज्या गोष्टी लोक देवासमोर करतात त्या गोष्टी या लोकांना राहुल गांधींसमोर कराव्या लागल्या. लोकांचा विश्वास भाजपवर असून, लोकं भाजपलाच पाठिंबा देतील असे ते म्हणाले.
CM Pramod Sawant : लोकं देवासमोर शपथ घेतात, यांनी राहुल गांधींसमोर घेतली : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
गोवा विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly Election 2022 ) पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Goa CM Pramod Sawant ) यांनी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांवर टीका केली ( Pramod Sawant Criticized Congress GFP ) आहे. लोकं त्यांच्यावर विश्वास न ठेवता भाजपला पाठिंबा देतील, असे ते म्हणाले.
प्रमोद सावंत
त्यांना कुणी गंभीरतेने घेत नाही
वृत्तसंस्था एएनआयशी ते बोलत होते. सावंत म्हणाले की, मला वाटते राहुल गांधी हे गोव्यात फक्त पर्यटनासाठी येतात. जर त्यांना येथील विकास झालेला दिसत नसेल तर ते इथे येऊन काय करतात. लक्षात ठेवा, त्यांना कुणीही गंभीरतेने घेत नाही, अशा शब्दात सावंत यांनी राहुल गांधींवर टीका ( Pramod Sawant Criticized Rahul Gandhi ) केली.