महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CM Nitish Kumar On India Alliance : काँग्रेसला इंडिया आघाडीत रस नाही - नितीश कुमार - मुख्यमंत्री नीतीश कुमार

CM Nitish Kumar On India Alliance : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेसला इंडिया आघाडीत रस नसल्याचं त्यांनी म्हटलंय. 5 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये काॅंग्रेस व्यग्र असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

CM Nitish Kumar On India Alliance
CM Nitish Kumar On India Alliance

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 3:50 PM IST

पटनाCM Nitish Kumar On India Alliance: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत इंडिया आघाडीची स्थापना झाली होती. मात्र, आता इंडिया आघाडीत कोणतंही काम होत नसल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केला आहे. इंडिया आघाडीकडं काँग्रेस पक्षाचं लक्ष नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कॉंग्रेस सध्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये व्यग्र असल्यााचा आरोप नितीश कुमार यांनी केलाय.

देशाचा इतिहास बदलण्याचा भाजपाचा प्रयत्न : यावेळी बोलताना नितीश कुमार यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही टीका केली आहे. "आज केंद्र सरकारचा देशाशी काहीही संबंध नाही. भाजपा सरकार देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत,"असं नितीश कुमार यांनी म्हटलंय. एकीकडं नितीश कुमार यांनी काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले असून, दुसरीकडं सर्वांना सोबत घेऊन चालत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सर्वांना सर्वांसोबत घेऊन चालतोय : "आम्ही सर्वांना एकत्र करतो आहोत. आम्ही सर्वांना सर्वांसोबत घेऊन चालतोय. आम्ही समाजवादी आहोत. आमचं सीपीआयशी असलेलं नातंही जुनं आहे. कम्युनिस्ट, समाजवाद्यांना एकत्र पुढं जायचं आहे," असं नितीश कुमार म्हणाले. भाजपाशी संबंध तोडल्यानंतर नितीशकुमार यांनी विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. विविध राज्यांत जाऊन त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतलीय.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात विरोधी पक्षांची एकजूट करण्यातही नितीश यशस्वी ठरले होते. यानंतर नितीश यांनी जूनमध्ये पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेस, टीएमसी, शिवसेना, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, द्रमुकसह 15 विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

हेही वाचा -

  1. India Alliance 4th meeting: इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीच्या ठिकाणावरून मतभेद, काँग्रेसचा मात्र इन्कार
  2. PM Modi On India Alliance : आगामी काळात हजारो तरुणांना रोजगार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा
  3. INDIA Meeting : इंडियाच्या बैठकीत मोठा निर्णय, 'या' ठिकाणी होणार पहिली जाहीर रॅली

ABOUT THE AUTHOR

...view details